इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील लसूडियामध्ये एका अपघातात दोन सॉफ्टवेअर इंजिनीयर तरुणांचा मृत्यू झाला आहे. कारनं दिलेल्या धडकेत दोघांचा दुर्दैवी शेवट झाला. अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका बंद कारला धक्का मारून सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार घडला. बंद पडलेल्या कार सुरू करण्यासाठी दोघे कार चालकाला मदत करत होते. तितक्यात देवासकडून येणाऱ्या भरधाव कारनं त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. परोपकार करणाऱ्या तरुणांवर काळानं घाला घातला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात विस्तारा हॉटेलच्या समोर झाला. रेडिओ कॉलनीत वास्तव्यास असलेला अमित आणि त्याचा मित्र अभिषेक चहा पिण्यासाठी दुचाकीवरून विस्तारा हॉटेलला गेले होते. त्यावेळी त्यांना रस्त्यात एक कार उभी असलेली दिसली. कारच्या इंजिनात बिघाड झाला होता. कार सुरू होत नसल्यानं चालक वैतागला होता. अडचणीत असलेल्या चालकाच्या मदतीला दोन मित्र धावले.
अमित आणि अभिषेक बंद पडलेल्या कारला धक्का देऊ लागले. कार सुरू करण्यासाठी अमित आणि अभिषेक मदत करत होते. यावेळी देवासहून येत असलेल्या भरधाव कारनं त्यांना धडक दिली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही इंदूरमधील एका कंपनीत कार्यरत होते.
अमित आणि अभिषेक बंद पडलेल्या कारला धक्का देऊ लागले. कार सुरू करण्यासाठी अमित आणि अभिषेक मदत करत होते. यावेळी देवासहून येत असलेल्या भरधाव कारनं त्यांना धडक दिली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही इंदूरमधील एका कंपनीत कार्यरत होते.
सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?
अमित आणि अभिषेक जबलपूरला जात होते, अशी माहिती त्यांच्या मित्रांनी दिली. अमित त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याला एक बहीण असून ती विवाहित आहे. वर्षभरापूर्वी त्याच्या वडिलांचा एका आजारामुळे मृत्यू झाला. अभिषेकच्या कुटुंबात आई, वडील आणि एक लहान भाऊ आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अमित आणि अभिषेकला धडक देणाऱ्या कारचा शोध सुरू आहे.