नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून आयकर रिटर्न (आयटीआर) भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जर तुम्ही देखील करदाते असाल तर तुम्ही उत्पन्न आणि कर मूल्यांकन करायला सुरुवात करायला हवी. कर भरण्याची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असली तरी, तुमच्याकडे अजून बराच वेळ आहे. परंतु कर भरण्याचे काम जितक्या लवकर पूर्ण कराल तितके चांगले कारण भारतात टॅक्स रिटर्न भरण्यासाठी अनेक कागदपात्रांची आवश्यकता असते. जसे की पगार किंवा उत्पन्न तपशील, बँक स्टेटमेंट, मागील टॅक्स स्टेटमेंट इत्यादी.शिवाय पगारदार आणि व्यावसायिक व्यक्तींसाठी काही नियम वेगळे आहेत, त्यामुळे तुम्ही ITR दाखल करण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल हे तुम्हाला माहीत असायला हवे. त्याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला येथे देत आहोत.

पॅन कार्ड
सर्वात महत्वाचे ओळखपत्र आणि कागदपत्रांमध्‍ये पॅन कार्डचा समावेश केला होतो. आयकर रिटर्न भरण्यासाठी तुम्हाला पॅन कार्डची आवश्यकता असते. पॅन हे सरकारद्वारे जारी केलेले एक ओळखपत्र आहे, ज्यामध्ये १०-अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतो. TDS साठी ते आवश्यक असते आणि तुम्हाला कर परतावा हवा असला तरीही तो तुमच्या बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे.

कामाची बातमी! एक पैसाही न गुंतवता हजारोंचा टॅक्स वाचवा, कर वाचविण्यासाठी एकच सवलत उपयोगी
आधार कार्ड
आयकर कायद्याच्या कलम १३९एए अंतर्गत करदात्यांना आयटीआर भरताना आधार क्रमांकाचा तपशील द्यावा लागतो. जर आधार नसेल तर तुम्हाला आधारसाठी अर्ज करावा लागेल आणि त्याचा एनरोलमेंट आयडी द्यावा लागेल. तसेच तुमचा आधार क्रमांक आणि पॅन लिंक असणे आवश्यक आहे. यासाठी अंतिम तारीख ३० जून २०२३ ठेवण्यात आली आहे.

फॉर्म १६
आयकर रिटर्न भरताना फॉर्म १६ द्यावा लागतो. ते देखील एक अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. एक प्रकारे हे तुमचे वेतन प्रमाणपत्र आहे. ज्यामध्ये तुमचा पगार, कर कपात इत्यादी माहिती असते. हा फॉर्म तुमच्या कंपनीने जारी केलेले असते. त्यात दोन भाग असतात – A आणि B.

Old vs New Tax Regime: नोकरदारांसाठी कोणती कर व्यवस्था फायद्याची? तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे एका क्लिकवर
फॉर्म-१६ए/ फॉर्म-१६बी/ फॉर्म- १६सी
फॉर्म-१६ए हे TDS प्रमाणपत्र आहे. जेव्हा तुम्हाला मुदत ठेवी, आवर्ती ठेवी इत्यादींमधून मिळणार्‍या उत्पन्नावर टीडीएस कापला जातो तेव्हा हे आवश्यक असते. प्रॉपर्टी खरेदी करताना फॉर्म-१४बी द्यावा लागतो. ५० लाखांपेक्षा जास्त रकमेची मालमत्ता विकली गेल्यास, टीडीएस कपात करणे अनिवार्य आहे. तसेच फॉर्म-१६सी अशा घरमालकांना द्यावा लागतो, ज्यांना भाड्यातून ५०,००० रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळते.

पगार स्लिप
जर तुम्ही पगारदार कर्मचारी असाल तर तुम्हाला तुमची मासिक पगार स्लिप द्यावी लागेल.

Tax Relief: नव्या आर्थिक वर्षापासून नवीन कर सवलत! काय आहेत लाभ, जाणून घ्या
बँक खाते तपशील
तुम्हाला तुमच्या सक्रिय बँक खात्याचा तपशील आयकरमध्ये द्यावा लागेल. यासाठी तुमचे नाव, खाते क्रमांक, IFSC, खात्याची वेळ आणि बँकेत तुमची किती खाती आहेत याची माहिती द्यावी लागेल. हे तुमच्या उत्पन्नाचे तपशील प्रमाणित करण्यासाठी वापरले जातात. जर रिफंड मिळणार असेल तर तो या खात्यात जमा होतो.

बँक पासबुक/स्टेटमेंट
तुम्हाला तुमच्या बँक खात्याचे पासबुक किंवा स्टेटमेंट देखील द्यावे लागेल. या पुराव्यातून तुमच्या बचत खात्यावर किती व्याज मिळते किंवा तुम्हाला FD वर किती परतावा मिळतो याबाबत माहिती मिळते.

गुंतवणुकीचा पुरावा
आयकर कायद्याअंतर्गत गुंतवणुकीवर कर वाचवण्याची सुविधा आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कोठे आणि किती गुंतवणूक केली याचा पुरावा द्यावा लागेल. जेणेकरून तुम्ही कर सवलतीचा दावा करता तेव्हा त्याची पडताळणी करता येईल. विमा प्रीमियम, पीपीएफ, एफडी, गृहकर्जाची परतफेड, देणगी पावती, शिक्षण शुल्क, म्युच्युअल फंड, शैक्षणिक कर्ज यासह इतर अनेक गुंतवणूक आणि खर्चांवर तुम्हाला सूट मिळू शकते. तसेच या सवलती जुन्या कर प्रणालीमध्येच उपलब्ध आहेत.

फॉर्म २६AS
हा फॉर्म तुमचे वार्षिक कर विवरण आहे. ज्यामध्ये तुमच्या पॅनवर भरलेला कराची माहिती असते. अशा प्रकारे हे तुमचे कर पासबुक असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here