मुंबई: अभिनेता प्रकरणात पर्यावरण मंत्री यांचा संबंध असल्याची चर्चा शिवसेनेनं फेटाळून लावली असली तरी त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. शिवसेना व ठाकरे कुटुंबावर सातत्यानं टीका करणारे माजी खासदार यांनी पुन्हा एकदा आदित्य यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं. आदित्य ठाकरे यांनी मुंबईचे महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांच्यासोबत विविध ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांचे फोटो माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याचाच संदर्भ देत नीलेश राणे यांनी आदित्य यांच्यावर टीका केली आहे. ‘प्रत्येक पावसात मुंबईकरांना बाहेर पडू नका असं सांगितलं जातं. पण मुंबई महापालिकेने पावसात बाहेर पडण्यासारखी मुंबई ठेवली आहे का,’ असा सवाल नीलेश यांनी केला आहे.

वाचा:

सुशांतसिंहच्या आत्महत्येच्या प्रकरणावरूनही त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला हाणला आहे. ‘सुशांतचं प्रकरण बिहार सरकारकडून सीबीआयकडे सोपवलं जाणार आहे. त्यामुळं पाहिजे तेवढं फिरून घ्या, नंतर फिरता येणार नाही,’ असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.

सुशांतसिंहची आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीवरून सध्या राजकारण तापलं आहे. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीत मुंबईतील युवा मंत्री हस्तक्षेप करत आहेत. त्यांच्या दबावामुळं मुंबई पोलीस मोकळेपणाने चौकशी करू शकत नाहीत, असा आरोप भाजपनं केला आहे. भाजपचा रोख पर्यावरण मंत्री व मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर आहे. बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत हिनं मुंबई पोलिसांच्या चौकशीबाबत नाराजी व्यक्त करताना आदित्य ठाकरे आणि करण जोहर यांच्या मैत्रीचा हवालाही दिला आहे. नीलेश राणे यांनीही याच अनुषंगानं आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

वाचा:

शिवसेनेनं व खुद्द आदित्य ठाकरे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘बॉलिवूडमधील अनेकांशी माझी चांगली मैत्री आहे. पण तो काही गुन्हा नाही. सुशांतसिंह प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिमेला तडा जाईल असं कुठलंही कृत्य माझ्या हातून होणार नाही,’ असं आदित्य यांनी कालच स्पष्ट केलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here