Crime News :  जुनं प्रेम मिळवण्यासाठी विवाहित प्रेयसीच्या चार वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. लग्नानंतर प्रियकरासोबत जाण्यास प्रेयसीने नकार दिला होता. त्याचा राग मनात धरून अखेर आरोपी प्रियकराने चिमुरड्याचे अपहरण केले. मुलाच्या अपहरणानंतर पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या. 

लग्नाआधीपासून 32 वर्षीय महिलेचे 27 वर्षीय तरुणाशी पाच वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र तिचा विवाह दुसऱ्या तरुणाशी झाला. तरी देखील प्रियकर आपले जुने प्रेम विसरायला तयार नव्हता. शिवाय  प्रेयसीला कसेही करून सोबत राहणाचा त्याने तगादा लावला होता. मात्र  तिने  प्रियकरासोबत जाण्यास नकार दिला. त्यातूनच त्याने तिच्या चार वर्षीय चिमुरड्याच्या अपहरणाचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले. विशेष म्हणजे  चिमुरड्याचे अपहरण करून  गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रियकराला  नाशिक रेल्वे स्थानकात शांतीनगर पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने अवघ्या 12  तासात ताब्यात घेत अटक केली आहे. रिपोन आकाश अली  व्यापारी  (वय 27) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी  रिपोन हा मूळचा  पश्चिम  बंगाल राज्यातील  कुचबिहार जिल्ह्याचा रहिवाशी आहे. तर तक्रारदार आयशा  ही  देखील  पश्चिम  बंगाल राज्यातील  कुचबिहार जिल्ह्यातील रहिवाशी आहे. या दोघांचे लग्ना आधीच प्रेमसंबंध होते. त्यातच भिवंडीतील टेमघर येथील चाळीत राहणारे मोहम्मद अली फकीर या तरुणासोबत तिचा निकाह झाला. त्यानंतर  मोहम्मद अली आणि त्याची पत्नी आयशा बीबी आपल्या चार वर्षीय आशिक अली मोहम्मद अली फकीर या मुलासह टेमघर परिसरात राहत होते. प्रेयसीला अधुनमधून भेटण्यासाठी त्याने तिच्या पतीशी ओळख करून मैत्री केली होती. त्यातच त्याने तिला मूळ गावी जाऊन आपला संसार थाटू असे आरोपी प्रियकराने तिच्या मागे तगादा लावला होता. मात्र ती त्याला नकार देत होती. त्यामुळे त्याने तिच्या चिमुरड्याच्या अपहरण करण्याचा कट रचला होता.

3 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी चिमुरडा घरा बाहेर खेळत असताना आढळून आला नाही. त्यामुळे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आशिक अली याची आई आयशा बीबी यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीचे पोलिसांनी गांभीर्य ओळखून अपहरणकर्त्याचा शोध सुरु केला. दरम्यान पाच वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या प्रियकर रिपोन व्यापारी याने विवाहित प्रेयसीच्या मोबाईलवर संपर्क साधून तुझा मुलगा माझ्या जवळ असून तू माझ्या सोबत राहायला ये, जर तू नाही आली तर तुझ्या  मुलाचे बरेवाईट करेन अशी धमकी दिली होती.

news reels reels

त्यानंतर तिने पोलिसांची संपर्क साधून मुलाची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीचे मोबाईल लोकेशन तपासले असता, तो नाशिक शहरात असल्याचे समोर आले. त्यानुसार शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता फडतरे आणि पोलीस पथकाने तातडीने दोन पथक तयार करून आरोपीला पकडण्यासाठी कारवाई सुरू केली.

तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यासाठी मुलाच्या आई सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता फडतरे या स्वतः रेल्वेने नाशिक येथे पोहचल्या होत्या. शिवाय आरोपीचे चिमुरड्याच्या आईशी सतत संपर्कात असतानाच, नाशिक  रेल्वे स्टेशनच्या पुलावर आरोपी रिपोन व्यापारी उभा असल्याचे दिसले. त्यानंतर  महिला पोलीस अधिकारी मुक्त फडतरे यांनी त्याच्या शिताफीने मुसक्या आवळल्या. अपहरण झालेल्या चिमुरड्याची त्याच्या तावडीतून सुखरूप सुटका करून अवघ्या बारा तासातच आरोपीला पकडून बेड्या ठोकल्याने पालकासोबतच पोलिसांनीही  सुटकेचा नि:श्वास सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here