तिरुपती: सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनीयर असलेल्या तरुणाला कारमध्ये जिवंत जाळण्यात आल्याची घटना आंध्र प्रदेशतील तिरुपती जिल्ह्यात घडली आहे. नागराजू असं मृताचं नाव आहे. नागराजूच्या मृत्यू प्रकरणात त्याच्या पत्नीनं गंभीर आरोप केले आहेत. नागराजूचा लहान भाऊ पुरुषोत्तमचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. याच महिलेच्या कुटुंबीयांनी नागराजूला संपवल्याचा आरोप त्याच्या पत्नीनं केला आहे.भावाला गावातून बाहेर का पाठवलंस, अशी विचारणा करत आरोपींनी नागराजूला लक्ष्य केलं. महिलेच्या कुटुंबीयांनी नागराजूला तडजोड करण्यासाठी बोलावलं. त्यानंतर त्याच्या कारवर पेट्रोल टाकून ती पेटवून देण्यात आली. यावेळी नागराजू कारमध्ये होता. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गांगुडुपल्लेमध्ये हा प्रकार घडला. पेटलेली कार पाहून स्थानिकांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. कारला लागलेल्या आगीत एक जण जिवंत जळाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
अरेरे! बंद कार पाहून दोन मित्र मदतीला; परोपकार करताना काळाचा घाला; इंजिनीयर तरुणांचा अंत
कारचा नंबर आणि कारमधील मृतदेहाच्या गळ्यात असलेल्या सोन्याच्या चेनच्या मदतीनं पोलिसांनी ओळख पटवली. कारमध्ये जळून मृत पावलेला नागराजू हा वदुरुकुप्पमच्या ब्राह्मणपल्लीचा रहिवासी आहे. नागराजू बंगळुरूतील सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत होता. पत्नी सुलोचना आणि दोन मुलं असा त्याचा परिवार आहे. नागराजूचा लहान भाऊ पुरुषोत्तमचे त्याच्या गावातील महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. तिच्या नातेवाईकांना याचा सुगावा लागला. त्यामुळे नागराजनं त्याच्या लहान भावाला बंगळुरूला पाठवून दिलं.
चार महिने विचारपूस नाही, आईचा फोन लागेना; मुलगा पोहोचला, दार तोडलं; आतलं दृश्य पाहून हादरला
नागराजू महिलेच्या कुटुंबाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी तो अनेकदा बंगळुरूहून ब्राह्मणपल्लीला जायचा. ‘महिलेच्या कुटुंबातील गोपी नावाच्या व्यक्तीनं नागराजूला फोन केला होता. मी महिलेच्या वतीनं बोलेन असं त्यानं कॉलवर सांगितलं. हे प्रकरण मिटवण्यासाठी नागराजूचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे गोपीचा फोन आल्यानंतर नागराजू निघाला. त्यानंतर काही वेळातच नागराजूच्या कारला आग लागल्याचा फोन आम्हाला आला. महिलेचे कुटुंबीय नागराजूच्या हत्येला जबाबदार आहेत. त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी,’ अशी मागणी सुलोचना यांनी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहबाह्य संबंधांचा तपास सुरू आहे. नागराजूच्या कुटुंबीयांनी रुपुंजयाच्या व्यक्तीबद्दल संशय व्यक्त केला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here