gadchiroli news, शेतकऱ्याने मुलाला कामासाठी तालुक्याला पाठवले, मनात होते वेगळेच, जे केले ते पाहून बसला धक्का – gadchiroli news the farmer took the extreme step of sending his son to the taluka headquarters for work
गडचिरोली: स्वतःच्या शेतात गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज (४ एप्रिल रोजी) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. हे ठिकाण कुरखेडा तालुका मुख्यालयापासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभिटोला येथे घडली. देवराम मानकू नैताम ( वय ५६ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.देवराम नैताम या शेतकरी बांधवाने पाच एकरात उन्हाळी धानपीक लागवड केली होती. धानाची रोवणी करून दीड महिन्याचा कालावधी लोटून गेल्यावरही धानपीक व्यवस्थित नसल्याने शेतकरी चिंतेत होता. सततच्या भारनियमनामुळे शेतीला पुरेसे पाणी मिळत नव्हतं. या परिस्थितीमुळे हिरव्यागार शेतात भेगा पडल्याने शेतकरी अस्वस्थ झाला होता. धानाला वेळेवर खतपाणी नसल्याचीही सतत खंत होती. त्यांनी ही व्यथा इतर शेतकरी बांधवांकडे सांगितल्याचे परिसरातील लोक सांगत आहेत. बीडच्या तरुणाची संघर्षगाथा, गायक होण्याचं स्वप्न भंगलं, आता बर्फगोळा विकून कमावले नाव, पैसा देवराम नैताम या शेतकऱ्याच्या घरी तीन मुली आहेत. त्यांपैकी एक मुलगी लग्नाची आहे. इतर मुलामुलींचे शिक्षण, घरखर्च, शेतातून उत्पन्न होत नाही, अशा परिस्थितीत संसार कसा सांभाळायचा या विवंचनेत हा शेतकरी होता. विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने अखेर मुलाला तालुका मुख्यालयात कामानिमित्त पाठवले. त्यानंतर दुपारच्या वेळेस आसपास कोणी नसताना आपल्याच शेतात पडसाच्या झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा आप्त परिवार असून या घटनेमुळे नैताम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळले आहे.