बारामती: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला बारामती पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागणार असून यानंतर अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्याबाबत बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात अॅट्रासिटी अंतर्गत फिर्याद दाखल झाली होती. या प्रकरणी बारामती जिल्हासत्र न्यायालयाने शहर पोलिसांना फेर तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत विश्वास उद्धव लालबिगे यांनी अॅड. हेमचंद्र मोरे यांच्यामार्फत बारामती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अॅट्रासिटी कायद्यान्वये फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.
अॅड. हेमचंद्र मोरे यांनी या प्रकरणाबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, एका मुलाखतीतील वक्तव्याबाबत सोनाक्षीविरोधात अॅट्रासिटीअंतर्गत लालबिगे यांनी अॅड. मोरें यांच्यामार्फत बारामती जिल्हा सत्र न्यायालयात अॅट्रासिटी कायद्यान्वये फिर्याद दाखल केलेली. या प्रकरणी अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधीशांनी बारामती शहर पोलिसांना सीआरपीसी कलम २०२ अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. मात्र बारामती शहर पोलिसांनी २०२ अंतर्गत दाखल केलेल्या अहवालात असे नमुद केले की, सोनाक्षीने त्या मुलाखतीत विशिष्ट जातीचा उल्लेख केला आहे पण मात्र कोणता गुन्हा केल्याचे दिसत नाही.

यानंतर आता वकील मोरे यांनी पोलिसांच्या तपासावरच शंका उपस्थित केली. त्यांनी सोनाक्षीचा जबाब न घेताच पोलिसांनी न्यायालयात अहवाल सादर केल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आणि तपासाबाबत सवाल उपस्थित केला.
मोरे यांच्या मते, पोलीस स्वत:च न्यायाधीश आणि आरोपींचे वकील असल्यासारखे वागत असून गुन्हा घडला नाही असे म्हणतायंत. त्यामुळे तपासाबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे.पी. दरेकर यांनीही बाब मान्य करत पोलिसांना या प्रकरणी फेर तपासाचे आदेश दिले आहेत. सीआरपीसी कलम २०२ अन्वये पुन्हा तपास करून याबाबतचा अहवाल न्यायालयास ३१ मे २०२३ रोजी अथवा त्यापूर्वी सादर करण्याचे आदेश बारामती शहर पोलिसांना देण्यात आले आहेत.
मधुर भांडारकरांनी सांगितली मराठी कलाकारांची ताकद