Worms Under Skin, बापरे! त्वचेखाली फिरू लागले जंत; सफाई कर्मचाऱ्याची बिकट अवस्था पाहून डॉक्टर हैराण – sewage worker in spain shows up at hospital with worms slithering under his skin
माद्रिद: सफाई कर्मचाऱ्याची अवस्था पाहून रुग्णालयातील डॉक्टर चक्रावून गेले. त्याच्या त्वचेखाली डॉक्टरांना जंत फिरताना दिसले. शरीरातील जंतांचं संक्रमण वाढल्यानं, ते त्वचेखाली फिरत असल्याचं साध्या डोळ्यांनी दिसत असल्यानं सफाई कर्मचाऱ्यानं रुग्णालय गाठलं. रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती अतिशय कमी असल्यानं संसर्ग वाढला. अशा स्थितीत सेप्सिस किंवा अवयव निकामी होण्याचा धोका असतो. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण गटार सफाईचं काम करायचा. त्याचं संपूर्ण आयुष्य गटारांची सफाई करण्यात गेलं. त्याच्या त्वचेच्या आत जंत फिरताना दिसत आहेत. या व्यक्तीचं वय ६४ वर्षे असू त्याच्या अंगाला खास सुटत आहे. याशिवाय त्याला अतिसाराचा त्रासही सुरू आहे. त्रास असह्य झाल्यानं त्यानं माद्रिदच्या युनिव्हर्सिटी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णाला स्ट्राँगिलोइड्स स्टेरकोरेलिसची लागण झाल्यानं त्याची अशी अवस्था झाली. स्ट्राँगिलोइड्स स्टेरकोरेलिस परजिवी जंत असून ते जगभरातील उष्णकटिबंधीय क्षेत्रात आढळून येतात. यामुळे स्ट्राँगिलॉयडियासिस नावाचा आजार याच जंतामुळे होतो. अरेरे! बंद कार पाहून दोन मित्र मदतीला; परोपकार करताना काळाचा घाला; इंजिनीयर तरुणांचा अंत त्वचा आणि दूषित मातीच्या संपर्कात आल्यानं अशा प्रकारचा त्रास होत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली. ‘जंत मानवी शरीरात प्रवेश करतात. आतड्यांपर्यंत पोहोचतात. तिथे ते परिपक्व होऊन अंडी देतात,’ अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर आहे. सफाई कर्मचारी संक्रमित कसा झाला, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याबद्दलची माहिती न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिननं प्रकाशित केली आहे. रुग्णाचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यात त्वचेखालील जंत अतिशय स्पष्ट दिसत आहेत. सफाई कर्मचाऱ्याला लागण कशी झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
डॉक्टरांनी शक्तिशाली औषधं देऊन रुग्णावर उपचार केले. सुदैवानं २४ तासांत रुग्णाची प्रकृती सुधारली. त्वचेखाली दिसणारे जंत गायब झाले. यानंतर रुग्णाला होणारा अतिसार आणि खाजेचा त्रासदेखील कमी झाला. याबद्दल रुग्णानं डॉक्टरांचे आभार मानले. आपण अतिशय सुदैवी असल्याची भावना त्यानं बोलून दाखवली.