हैदराबाद : अयोध्येत आज सोहळा पारर पडतोय. यापूर्वी ”चे () अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असुदुद्दीन ओवैसी () यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी ‘बाबरी जिंदा है’ असा हॅशटॅग (#BabriZindaHai) वापरलाय. यापूर्वी यांनी भूमिपूजन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहभागी होण्यावर आक्षेप घेत ‘हे संविधानाचं उल्लंघन’ असल्याचं म्हटलं होतं.

असुदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या ट्विटमध्ये ‘बाबरी मशिद होती आणि इंशाअल्लाह भविष्यातही राहील’ असं म्हटलंय.

वाचा :

वाचा :

वाचा :

‘धर्मनिरपेक्षता हे भारताच्या संविधानाचं अभिन्न अंग आहे आणि पंतप्रधान या कार्यक्रमात सहभागी होऊन संविधानाचा अनादर करत आहेत’ असं म्हणत ओवैसी यांनी याअगोदर पंतप्रधानांच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होण्याला आक्षेप घेतला होता.

राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या वादात असदुद्दीन ओवैसी यांनी केवळ सत्ताधारी भाजपवर टीका केलेली नाही तर ‘काँग्रेस मूकपणे हिंदुत्वाचे राजकारण करत आला आहे. बाबरीच्या विद्ध्वंसात काँग्रेसचाही हात आहे’ असं म्हणत काँग्रेसवरही निशाणा साधलाय.

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’कडून करण्यात आलंय. सगळ्या नेत्यांना याच ट्रस्ट मार्फत निमंत्रण धाडण्यात आलंय. मात्र, ‘आमच्या कार्यकाळात कोटी हिंदुंचं स्वप्न साकार होणार आहे. कम्युनिस्ट आणि सारख्या पक्षांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तर देण्याचीही गरज नाही. भारताचं संविधान प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य देतं’, असं म्हणत तेलंगणा भाजपचे नेते आणि मुख्य प्रवक्ते कृष्णा सागर राव यांनी ओवैसींनाही भूमिपूजन सोहळ्याचं आमंत्रण दिलं होतं.

वाचा :

वाचा :

राम मंदिर भूमिपूजन

आज ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. श्री राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असून, मंगळवारी भगवान रामाला आमंत्रित करण्यापूर्वी सर्व प्रमुख देवदेवतांना आमंत्रित करण्यासाठी ‘रामार्चन’ पूजा सुरू झालीय. दरम्यान, श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून, शरयू नदी, हनुमान गढी आणि श्रीरामजन्मभूमी या तीन ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी भेट देणार आहेत.

वाचा :

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here