नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करतील. राजधानी दिल्लीतीनून लखनऊला जाण्यासाठी निघाले आहेत. पंतप्रधानांची वेशभूषा रामरंगात रंगलेली दिसते आहे. सर्वसाधारणपणे चुडीदार पायजामा आणि कुर्ता परिधान करणारे पंतप्रधान मोदी यांनी आज धोती आणि सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. आज सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान मोदी अयोध्येला पोहोचणार आहेत.

पंतप्रधान मोदींचा असा आहे संपूर्ण कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी दिल्लीहून लखनऊसाठी रवाना झाले. एका तासानंतर म्हणजेच १० वाजून ३५ मिनिटांनी ते लखनऊला पोहोचतील. तेथे ५ मिनिटांनंतर म्हणजेच १० वाजून ४० मिनिटांनी ते अयोध्येसाठी रवाना होतील. साडे अकरा वाजता पंतप्रधान मोदी अयोध्ये पोहोचतील आणि साडे बारा वाजता भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील.

मोदी म्हणाले होते मंदिर बनल्यानंतर अयोध्येला जाईन
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २९ वर्षांपू्र्वी अयोध्येला गेले होते. त्यावेळी आता तुम्ही पुन्हा अयोध्येला कधी येणार असे एका पत्रकाराने त्यांना विचारले होते. त्यावर मंदिर तयार झाल्यानंतर आपण आयोध्येला येऊ असे उत्तर दिले होते.

अयोध्येतील पंतप्रधान मोदींचा असा असेल कार्यक्रम
> ५ ऑगस्टच्या सकाळी दिल्लीहून प्रस्थान

> ९.३५ वाजता दिल्लीहून होणार विशेष विमानाचे उड्डाण

> १०.३५ वाजता लखनऊ एअरपोर्टवर विशेष विमान उतरणार

> १०.४० वाजता हेलिकॉप्टरद्वारे अयोध्येसाठी प्रस्थान

> ११.३० वाजता अयोध्येतील साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरणार

> ११.४० वाजता हनुमानगडीवर पोहोचून १० मिनिटासाठई दर्शन-पूजन

> १२ वाजता राम जन्मभूमी परिसरात पोहोचणार

> १० मिनिटांमध्ये रामलल्ला विराजमानाचे दर्शन-पूजन

> १२.१५ वाजता रामलल्ला परिसरात पारिजाताच्या रोपट्याचे रोपण

> १२.३० वाजता भूमिपूजन कार्यक्रमाचा शुभारंभ

> १२.४० वाजता राम मंदिराच्या कोनशिलेची स्थापना

> २.०५ वाजता साकेत हेलिपॅडसाठी प्रस्थान

> २.२० वाजता लखनऊसाठी हेलिकॉप्टर करणार उड्डाण

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here