छत्तीसगढः लग्नात भेट म्हणून मिळालेल्या होम थिएटरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत नवरदेवासह त्याच्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. लग्नाच्या दोनच दिवसानंतर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून तो वधूचा प्रियकर असल्याची बाब समोर आली आहे.कबीरधाम जिल्ह्यातील चमारी गावात राहणाऱ्या हेमेंद्र मेरावीचे याच महिन्यात लग्न झाले होते. सोमवारी हेमेंद्र आणि त्याच्या कुटुंबातील लोक घरातच लग्नातील गिफ्ट खोलून पाहत होते. त्याचवेळी लग्नात गिफ्ट म्हणून मिळालेला होम थिएटर चालू करण्यासाठी बटण दाबताच एक मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की या घटनेत हेमेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मोठा भाऊही गंभीर जखमी झाला. उपचारांसाठी त्याला रुग्णालयात दाखल केला असता तिथे त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा चौकशीदरम्यान हा होम थिएटर वधुच्या कुटुंबीयांनी दिला नसल्याचे समोर आलं. मध्यप्रदेश इथे राहणारा संजू मरकाम याने हा होम थिएटर गिफ्ट केला होता. या तरुणाचे आणि वधुचे प्रेमसंबंध होते. त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते. मात्र, तिचे लग्न दुसरीकडे ठरल्यामुळं त्याला राग अनावर झाला. तरुणीचे लग्न ठरल्यानंतर प्रियकराचे व तिच्या पतीचे फोनवरुन भांडणही झालं होतं. त्यानंतर त्याने वधू-वरांना मारण्याचा प्लान बनवला.

संजू मरकामने दोघांना गिफ्ट घेण्यासाठी होम थिएटर विकत घेतला. त्यानंतर त्यात दारुगोळा, अमोनियम नायट्रेट आणि पेट्रोल याचे मिश्रण करुन एक स्फोटके तयार केली. व ती होम थियेटरमध्ये लावली. होम थिएटरचा जसा विजेशी संपर्क झाला त्याचा स्फोट झाला. आरोपीने वधु-वरांना संपवण्याचा कट रचला होता. तो स्वतःच लग्न मंडवात ठेवून निघून आला होता.
आरोपी संजू हा बालाघाट जिल्ह्यातील छपला गावचा रहिवासी असून तो आधीपासूनच विवाहित आहे. त्याला दोन मुलं आहेत तसंच तो व्यावसायाने मॅकेनिक आहे. तरुणीसोबत लग्न करण्यासाठी त्याने का क्रूर प्लान आखला होता.
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू