क्रूड ऑइलचा ताजा भाव
कच्च्या तेलाच्या किमतीत आज पुन्हा एकदा उसळी पाहायला मिळत असून दोन्ही प्रमुख क्रूड ऑइलच्या दरात अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे दिसत आहे. या दरम्यान, देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर समान पातळीवर असले तरी दिल्ली-एनसीआरमधील काही शहरांमध्ये वाहन इंधनाच्या दरात वाढ नोंदवली गेली.
विशेष म्हणजे सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केल्याची घोषणा केल्यापासून क्रूडचे दर सातत्याने वाढत आहेत. आज बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.६% वाढून $८५.४४ प्रति बॅरल तर WTI क्रूडची किंमत ०.५२ टक्के वाढीसह $८१.१२ प्रति बॅरलवर पोहोचली आहे.
विंडफाल टॅक्स
केंद्र सरकारने काल म्हणजे मंगळावरपासून देशातील कच्च्या तेलाच्या उत्पादनावर लागू होणारा विंडफॉल कर रद्द केला आहे. आतापर्यंत कच्च्या तेलावर प्रति टन ३५०० रुपये ($४२.५६) दराने विंडफॉल कर लागू होता. मात्र, यापुढे आता कोणताही क्रूडच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. गेल्या वर्षी १ जुलै रोजी देशात पहिल्यांदा विंडफॉल टॅक्स लागू करण्यात आला होता. ऊर्जेच्या वाढीव किमतींमुळे तेल उत्पादकांचा नफा अनेक पटींनी वाढल्यामुळे कर लागू करण्यात आला होता.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती
कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असताना आज ५ एप्रिल रोजीही भारतीय तेल कंपन्यांनी वाहन इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी जाहीर केलेल्या नवीन दरानुसार सर्व राज्यांतील वाहनांच्या इंधनाचे दर ‘जैसे थे’ आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारनं घेतलेला निर्णय म्हणजे अपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय – अमोल मिटकरी