घटनेची माहिती मिळाल्यावर बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह रुग्णालयात हलविला. या प्रकरणी राकेश राठोड यांनी दिलेल्या माहितीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेश चौधरी हे करीत आहेत. आयुषवर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आयुष हा भुसावळ वकील संघातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. पुखराज राठोड यांचा नातू व ॲड. निलेश राठोड याचा लहान मुलगा होता. या दुर्दैवी घटनेने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आयुषने अचानक टोकाच पाऊल उचलल्याने त्याच्या मित्र परिवारालाही मोठा धक्का बसला आहे.
ठाण्यात गुंडगिरी चालू, महिलांना मारायची दिघेंची, बाळासाहेबांची शिकवण नाही | रोशनी शिंदे
स्ट्राँग बनण्याचे नाटक आता होणार नाही….बाय..
मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या करण्यापूर्वी रात्री अडीच वाजताच्या सुमारास आयुषने त्याच्या आईला आणि मोठ्या भावाला फोन केला, पिण्यासाठी पाणी आणून देऊ का? अशी विचारणा केली, यावेळी आयुषला तू अजून झोपला नाहीस का? अशी विचारणा त्याच्या भावाने केली. त्यावर आयुषने झोपतोच असे सांगत फोन ठेवला. मात्र आयुष सकाळी उठलाच नाही, रात्रीत आयुषने जीवन संपविले अन् जगाचा निरोप घेतला.
मृत्यूपूर्वी आयुषने चिठ्ठी लिहिली होती. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही, स्ट्राँग बनण्याचे नाटक आता होणार नाही.. बाय असा आशय चिठ्ठीत नमूद आहे. दरम्यान गेल्या आठवड्यातच आयुषने त्याच्या काकांना पुढील आयुष्याचे नियोजन लिहून दिले होते, त्याला कायद्याचे शिक्षण घ्यायचे होते. अशीही माहिती समोर आली आहे.