काही दिवसांपूर्वीच मी अनिल भैया यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती, करोनातून हळूहळू त्यांच्या प्रकृतीला आराम मिळत असतानाच अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली हा मोठा आघात आमच्या शिवसेना परिवारावर तर आहेच पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नगर जिल्ह्यातल्या तमाम जनतेने सुद्धा त्यांचा आपला अनिल भैय्या गमावला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.
युती सरकारच्या काळात मंत्रीमंडळात असलेले अनिल भैया राठोड म्हणजे हिंदुत्वाचा बुलंद आवाज होते. रस्त्यावर स्वत: उतरून लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी शिवसेना नगर जिल्ह्यात अक्षरश: रुजविली. लोकांसाठी आंदोलने केली, त्यांच्या समस्यांची तड लावली. नगर शहरात तर त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आणि ते यशस्वी करून दाखवले. नगर जिल्ह्यातून २५ वर्षे सतत आमदार म्हणून निवडून येत असले तरी रस्त्यावरचा सामान्य कार्यकर्ता अशी ओळख सांगण्यात त्यांना अभिमान होता, कुठलाही अहंकार नसलेला आणि आपला जन्मच मुळी लोकांसाठी झालेला आहे असे समजणाऱ्या अनिल भैया यांच्या जाण्याने शिवसेनेतील आमच्या अत्यंत विश्वासू सहकारी, कट्टर शिवसैनिक आम्ही गमावला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अनिल राठोड यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. राठोड यांच्या मागे पत्नी, एक मुलगी व मुलगा विक्रम राठोड, सून असा परिवार आहे. राठोड हे
विधानसभा मतदार संघातून सलग २५ वर्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनाने नगरमधील शिवसेना शोकमग्न झाली आहे. राठोड यांच्यावर सकाळी दहा वाजता अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, राठोड यांना आठ दिवसापूर्वी करोना झाला होता. त्यामुळे त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. या उपचाराला ते चांगला प्रतिसादही देत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः राठोड यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. मात्र आज पहाटे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
I like the valuable information you provide in your articles.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.