दख्खनचा राजा जोतिबाचा अर्थ –

दख्खनचा राजा म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबा विराजमान आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा अर्थात नाथ केदारेश्वर हे बद्रिकेदारचचं रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी आणि १२ सूर्याचं तेज या सर्वांचा मिळून एक तेजःपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ! ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश, वायू, तेज, आप (पाणी) आकाश आणि पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचं शक्तीदेवत म्हणजेच ज्योतिबा. ज्योतिबा अनेकांचं कुलदैवत असल्याने येथे कायम दर्शनासाठी गर्दी होत असते.

ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस​

ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस​

दरवर्षी चैत्र पौर्णिमा हस्त नक्षत्रावर ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस असतो. यासाठी पहाटे पाच ते सहा वाजता ज्योतिबाचा शासकीय महाअभिषेक होतो. साधारण सकाळी नाथांची महावस्त्र आणि अलंकारिक पूजा केली जाते. दुपारी एक ते दीडच्या दरम्यान मुख्य यात्रेचा प्रारंभ होतो. तत्कालीन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी, जोतिबा मंदिरातील सर्व पुजारी आणि मानाच्या सासनकाठ्यांचे प्रमुख यावेळी उपस्थित असतात.

सासनकाठी म्हणजे काय?

सासनकाठी म्हणजे काय?

सर्व विधी झाल्यानंतर शासन काठ्यांची मिरवणूक सुरू होते. सासनकाठी म्हणजे नाथ केदाराचा विजय ध्वज. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या या पूर्वपार चाललेल्या परंपरेने आजही हजारो सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर जातात. सासनकाठीस शासनकाठी असंही म्हणलं जातं. सासनकाठी ही सुमारे ४० ते ४५ फूट उंचीची जाड वेळुची (कळकाची) असते. हा कळक आणताना आणि निवडताना विशिष्ट प्रकारे पारख आणि पूजा विधी केला जातो. प्रत्येक सासन काठीचं निशाण हे वेगवेगळे असतं. हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो, त्यावेळेस देवस्थान कमिटीचे भालदार चोपदार फक्त संत नावजीनाथच्या किवळ काठीस पानाचा विडा देऊन आमंत्रण देतात आणि तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होतो.

मिरवणुकीमध्ये एकूण ९६ सासनकाठ्या

मिरवणुकीमध्ये एकूण ९६ सासनकाठ्या

या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान इनाम पाडळी (जि.सातारा) या सासनकाठीचा, त्यानंतर मौजे विहे (ता.पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, वाळवा तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी ग्वाल्हेरच्या शिंदे उर्फ सिंधिया सरकार, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता.मिरज), कसबा सांगाव (ता.कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली), रेठरे बुद्रुक साळुंखे (ता.कराड) यांच्या मानाच्या १८ सासनकाठ्या सहभागी होतात. मान नसलेल्या ५७ आणि इतर २९ अशा एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी असतात.

सासनकाठी खांद्यावर घेऊन चालणं

सासनकाठी खांद्यावर घेऊन चालणं

या मिरवणुकीमध्ये २० फुटांपासून ते ७० ते ८० फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. सासनकाठी खांद्यावर घेऊन चालणं आणि तोरण्या (दोर) सांभाळणं हे अतिशय कौशल्याचं काम असतं. ही तोरणे संभाळण्याचा मान प्रमुख तीन तक्क्षिमा मधील घराण्यांचा असतो आणि ते लोक ही तीन तोरणे कोशल्याने हाताळतात.

अशी होते यात्रेची सांगता

अशी होते यात्रेची सांगता

संध्याकाळी पाच वाजता नाथाची आरती होऊन नाथांची पालखी श्री यमाई देवीकडे प्रस्थान करते. नाथांच्या पालखी बरोबरच नाथांचा मानाचा घोडा, उंट, वाजंत्री, देव सेविकांच्या सर्व लवाजम्यासह सर्व पुजारी यासह सर्व भक्तजन यमाई मंदिराकडे जातात. दरम्यान पालखी चौथऱ्यावर थांबून विसावा घेतला जातो आणि सूर्यास्तानंतर हिलाल दिवटीच्या प्रकाशात नाथांची पालखी यमाई मंदिराकडे प्रस्थान करते आणि यमाई मंदिरासमोर सदरेवर नाथांची पालखी विराजमान होते.

तोफेची सलामी होऊन यात्रेची सांग

तोफेची सलामी होऊन यात्रेची सांग

यानंतर जगदनीचे स्वरूप कट्यारीसोबत श्री यमाई म्हणजे रेणुका देवीचा विवाह सोहळा संपन्न होतो. विवाह सोहळा झाल्यानंतर नाथांची पालखी परत मंदिराकडे प्रस्थान करते. प्रदक्षिणा करून नाथांची पालखी सदरेवर विराजमान होते आणि यानंतर तोफेची सलामी होऊन यात्रेची सांगता होते.

हजारो हात मदतीसाठी

हजारो हात मदतीसाठी

या ज्योतिबाच्या यात्रेसाठी राज्यभरातून लाखों भाविक दरवर्षी कोल्हापुरात येतात. यात्रेच्या निमिताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात. चैत्र यात्रेत गुलाल – खोबरं, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते. सासनकाठ्या चाळीस फूट उंचीच्या असतात. भर उन्हात तरुण वर्ग, गुलालात चिंब होऊन नाचतो. सर्वांच्या मुखात जोतिबाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर असतो. तर संपूर्ण डोंगर गुलाबी रंगानी रंगून गेलेला असतो. या यात्रेत भाविक, भक्तांसह देवस्थान समिती, पोलीस प्रशासन प्रत्येक जण देवाची सेवा बजावत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here