सोनीपत : एका तरुणीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. हरियाणातील सोनीपत इथं एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यामध्ये आता पोलिसांनी तिच्या हत्येचं खरं कारण समोर आणलं आहे. मुलीच्या प्रियकरानेच तिची गोळ्या झाडून हत्या केली होती. इतकंच नाहीतर यानंतर त्याने तिचा मृतदेह एका फार्म हाऊसमध्ये पुरला होता.जून २०२२ मध्ये या तरुणीची हत्या झाली होती. अखेर आता पोलिसांनी या प्रकरणाचं गूढ शोधून काढलं आहे. भवानी पोलिसांनी या प्रकरणाची उकल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी रोहतक इथे बालंद गावात राहणारी होती. ती कामानिमित्त कॅनडाला राहत होती. जानेवारी २०२२ मध्ये ती प्रियकर सुनीलला भेटण्यासाठी सोनीपत आली. पण हा तिचा शेवट होता, याची तिला कल्पनाही नव्हती.

Crime Diary: बहि‍णीच्या हत्येची कबुली, मृतदेहासह २१० हाडं सापडली; तरुणी ९ वर्षांनी जिवंत परतली; कशी?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आधी तिच्या घरी रोहतकला गेली. त्यानंतर प्रियकराने तिला सोनीपत इथे भेटण्यासाठी बोलावलं. ती त्याला भेटण्यासाठी गेली ती परतलीच नाही. २२ जानेवारी २०२२ ला तिच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर तिचा खूप शोध घेण्यात आला पण पत्ता लागला नाही.

यानंतर अखेर अपहरणानंतर तिच्या हत्या झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आणि तपासाला वेगळंच वळण लागलं. सध्या पोलिसांनी फार्म हाऊसमधून तिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तिच्या शरीराचे सांगाडे ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

Crime Diary: रोज थोडं-थोडं करून पतीला जीव घेतला, पुरावाही नाही ठेवला; वाचा सायलंट किलर ‘सौ’ची कहाणी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here