गुवाहाटी: गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडियमवर आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमधील पहिलाच सामना रंगणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली पंजाब किंग्जचा संघ यंदाच्या लीगमध्ये खेळणार आहे. तर संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखाली राजस्थान रॉयल्स खेळणार आहे. या दोन्ही संघांनी आपापल्या पहिल्या सामन्यात विजय नोंदवला आहे. त्यामुळे हा सामना जिंकत सलग दुसरा मिळवण्याचा दोन्ही संघांचा मानस असेल. आजच्या या सामन्यापूर्वी पंजाबच्या संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे. पंजाब संघाचा अष्टपैलू राज अंगद बावा दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी पंजाब किंग्स संघाने यंदाच्या लीगसाठी बदली खेळाडूची घोषणा केली आहे. ज्याची माहिती आयपीएलने स्वतःच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. आयपीएलने जारी केलेल्या मीडिया रिलीझनुसार, पंजाब किंग्जने राज बावाच्या जागी गुरनूर सिंग ब्रारला २० लाख रुपयांना करारबद्ध केले आहे. त्याचवेळी, गेल्या मोसमात पंजाब किंग्जकडून दोन सामने खेळलेला राज अंगद बावा डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे.
कोण आहे हा खेळाडू?
गुरनूर सिंगबद्दल बोलायचे तर तो डावखुरा फलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने डिसेंबर २०२२ मध्ये पंजाबकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दुसरीकडे, गुरनूरने ५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १२०.२२ च्या स्ट्राइक रेटने १०७ धावा केल्या आणि ३.८० च्या इकॉनॉमीसह ७ फलंदाजांना आपले बळी बनवले. जर एखादा खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वेगाने धावा करू शकतो, तर तो पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्येही प्रभावी ठरू शकतो.
आयपीएल २०२३ मध्ये पंजाब किंग्जची विजयी सुरुवात
विशेष म्हणजे आयपीएलमध्ये यावेळी शिखर धवनचा कर्णधार असलेला संघ लयीत दिसत आहे. कारण पंजाबने त्यांच्या पहिल्याच सामन्यात चांगली कामगिरी करून केकेआरविरुद्ध विजय मिळवला होता आणि आज संध्याकाळी साडेसात वाजता आयपीएलमध्ये पंजाबचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. आता या सामन्यात संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला
पंजाब किंग्ज संघ:
शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, गुरनूर सिंग ब्रार, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, बलतेज सिंग, कागिसो रबाडा , हरप्रीत ब्रार, राहुल चहर, सॅम कुरान, सिकंदर रझा, हरप्रीत भाटिया, विद्वथ कावेरप्पा, शिवम सिंग आणि मोहित राठी.