मँगलोर: सत्तरीतल्या आजीबाईंनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा रेल्वे अपघात टळला आहे. रेल्वेच्या रुळांवर झाड पडलेलं पाहून वृद्ध महिलेनं समयसूचकता दाखवली. त्यामुळे शेकडो प्रवाशांचा जीव वाचला. मँगलोरच्या सीमावर्ती भागात असलेल्या मांडरा परिसरात ही घटना घडली. महिलेनं लाल कपडा दाखवत ट्रेन रोखली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मँगलोर-मुंबई मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा मोठा अपघात ७० वर्षांच्या चंद्रावती यांच्या प्रसंगावधानामुळे टळला. रेल्वे रुळांवर कोसळलेलं झाड पाहून चंद्रावती यांना संभाव्य धोक्याची कल्पना आली. झाड पाहून त्या तातडीनं घरात धावल्या. पुढच्या काही मिनिटांत त्या लाल रंगाचा कपडा घेऊन बाहेर आल्या. रेल्वे रुळांच्या शेजारी लाल कपडा फडकवत चंद्रावती उभ्या राहिल्या. यामुळे लोको पायलटला पुढील धोका लक्षात आला. त्यांनी वेळीच ट्रेन रोखली.
पुरुषोत्तमला गावाबाहेर का पाठवलंस? कॉल करून इंजिनीयरला बोलावलं; कारसह जिवंत पेटवलं, पण..
‘घरात असताना मी मोठा आवाज ऐकला. तो आवाज ऐकून मी घराबाहेर आले. रेल्वे रुळांवर झाड पडल्याचं पाहिलं. याची माहिती मी सर्वप्रथम मुलाला दिली. तितक्यात मी ट्रेनचा आवाज ऐकला. मी लगेच आत गेले. एक लाल रंगाचा कपडा शोधला आणि बाहेर आले. तो कपडा फडकावत रेल्वेच्या रुळांजवळच उभे राहिले. तिथून जाणारी ट्रेन थांबली,’ असा घटनाक्रम चंद्रावती यांनी सांगितला.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

चंद्रावती यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला. त्याबद्दल रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं. चंद्रावती यांनी लाल कापड थांबवून ट्रेन रोखली. यानंतर रेल्वे रुळांवर पडलेलं झाड बाजूला करण्यात आलं. त्यासाठी अर्धा तास लागला. अर्ध्या तासानंतर मत्स्यगंधा एक्स्प्रेस रवाना झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here