ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने ग्राहकांना अनेक अधिकार दिले आहेत. ग्राहकांना जागरुक आणि फसवणुकीपासून वाचवण्यासाठी नॅशनल कंज्यूमर हेल्पलाइन पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. एखाद्याला ग्राहकाची सामान खरेदी करताना फसणूक झाली असल्यास ग्राहक या पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतो. ग्राहक दुकानदाराकडून किंवा ऑनलाइन नुकसानभरपाईची मागणी करू शकतो. तसंच आधी दिलेल्या खराब क्वालिटीचं प्रोडक्ट नवीन उत्पादनांसह बदलू शकतो.
हेल्पलाइन नंबर
ग्राहक व्यवहार विभाग, ग्राहक व्यवहार मंत्रालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ग्राहकांना १९१५ हा हेल्पलाइन क्रमांक दिला आहे. या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनद्वारे कोणताही ग्राहक सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत आपली तक्रार नोंदवू शकतो. National Consumer Helpline अर्थात NCH चं अॅपदेखील आहे. या अॅपद्वारेही तक्रार दाखल करता येऊ शकते.
सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?
उमंग अॅपद्वारेही (Umang App) ग्राहक आपली तक्रार रजिस्टर करू शकतो. त्याशिवाय ८८००००१९१५ या क्रमांकावर एसएमएस करुनही ग्राहक आपल्या समस्या सोडवू शकतात. तसंच कंज्यूमर अफेअर मिनिस्ट्री जागो ग्राहक जागो नावाने एक ट्विटर अकाउंट आहे. त्याद्वारेही ग्राहक तक्रार दाखल करू शकतो.
ऑनलाइन अशी दाखल करा तक्रार
ग्राहकाला ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची असल्यास NCH पोर्टल https://consumerhelpline.gov.in/ वर लॉगइन करावं लागेल. त्यानंतर पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीवर क्लिक करुन अकाउंट तयार करावं लागेल. अकाउंट तयार करुन ग्राहक तक्रार दाखल करू शकतो. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नुसार, प्रत्येक ग्राहकाला निकृष्ट उत्पादनामुळे सेवेत कमतरता असल्यास, तसंच कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्यास, तो याबाबत तक्रार करू शकतो.