तुरीच्या दरात घसरण
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मार्चमध्ये मध्यंतरी तुरीला चांगला भाव मिळाला होता. परंतु,आता एप्रिल महिन्यात तुरीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. अकोल्यात सोमवारी म्हणजेच ३ एप्रिल रोजी तुरीच्या दर ३४५ रुपयांनी घसरले होते. त्यामुळे तुरीला ७ हजार पासून ८ हजार ४५० रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला. आजही म्हणजेच ५ एप्रिल रोजी अकोल्यात तुरीचे दर १२५ रुपयांनी घसरले आहेत. आज तुरीला ७ हजार पासून जास्तीत जास्त ८ हजार ३२५ रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला. तर इथे १ हजार ४९७ इतकी क्विंटल तूर खरेदी झाली आहे. इतकंच नव्हे तर अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील तुरीचे दर दोन दिवसांत २२५ रुपयांनी घसरले आहेत. तर आज ६५ रुपयांनी खाली आले आहे. त्यामुळ आजचा तुरीचा ७ हजार ८५० पासून ८ हजार ६४० रूपयांपर्यत होता. दरम्यान, अकोल्यात आज हरभऱ्याच्या दरात घसरण झाली असून हा भाव ४ हजार पासून ५ हजार ५ रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे आले आहेत. तसेच पांढऱ्या हरभऱ्याला ६ हजार ९०० रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव होता. तर अकोटच्या बाजारात आज हरभऱ्याला ४ हजार ५०० पासून ४ हजार ९९५ प्रतिक्विंटलप्रमाणे भाव मिळाला आहे.