अहमदनगर: अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यामुळं अवघा देश आज राममय झाला आहे. सोशल मीडियावरून देशातील रामभक्त आपल्या भावना व्यक्त करत आहे. एकमेकांचं अभिनंदन करत आहेत. आजच्या या मंगलमय दिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी रामनामाचा महिमा सांगणारं जबरदस्त ट्वीट केलं आहे. रोहित पवारांचं हे ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहे.

सर्वांना सन्मती दे… अशी प्रार्थना रोहित पवार यांनी श्रीरामाकडे केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘रामप्रहरापासून आपला दिवस सुरू होतो. जय जय राम कृष्ण हरी हा जगण्याचा मंत्र असतो. रामराम ही एकमेकांच्या ओळखीची खूण असते. साने गुरूजी म्हणायचे, ‘रामराम म्हणताना तू ही राम आणि मी ही राम हे अपेक्षित असतं’. आपण पिढ्यान् पिढ्या असेच वागत आलो आहोत.’

ते पुढं म्हणतात, ‘राम आपला एकट्याचा नव्हता, तर तो सगळ्यांचा होता आणि राहणार. शेवटचा श्वास घेताना राम म्हणणाऱ्या गांधींजींचा राम, वारकऱ्यांना सामाजिक समता शिकवणारे ज्ञानदेव तुकाराम. आपल्याच शेतात अयोध्या समजून शेतात राबणारा एखादा सखाराम. राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे’.

‘रामाने राम सेतू बांधला आपण प्रभू श्रीरामाचे विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया. जाती धर्माच्या बाबतीत भल्या भल्या पुरुषांच्या मर्यादा दिसून येतात, निदान मर्यादापुरुषोत्तम रामाच्या बाबतीत असं होऊ नये,’ अशी अपेक्षा रोहित पवार यांनी शेवटी व्यक्त केली आहे.

राज्यात आनंदोत्सव

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा प्रचंड उत्साह देशभरात दिसत आहे. महाराष्ट्रातही अनेक घरात भगवा ध्वज उभारून, रांगोळी काढून आनंद व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी महाआरत्या केल्या जात आहेत. रामनामाचा जयघोष सुरू आहे. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here