सातारा : मुळिकवाडी (ता. फलटण) गावाच्या हद्दीत बाचकी नावाच्या शिवारात सुरेश शिवराम पवार याने त्याच्या मालकीच्या शेतात अंमली पदार्थ अफूची लागवड केली होती. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शेतात छापा मारला. त्यावेळी २ हजार ७३७ झाडांची लागवड केली असल्याचे तपासात उघडकीस आले. पोलिसांनी २ लाख ७७ हजार रुपयांचा अफू जप्त केला आहे.पोलिसांनी पाहणी केली असता त्यातील काही झाडांची बोंडे तोडून ती मक्याच्या पिकामध्ये लपवून ठेवली होती. ती सर्व झाडाची बोंडे पोलिसांनी जप्त केली. हा अंमली पदार्थ एका प्लास्टिक गोणपाटाच्या पोत्यामध्ये ठेवण्यात आला होता. यात लहान मोठी अंमली पदार्थ अफूची २ हजार ७३७ झाडे, काही अर्धवट ओली झाडे होती. त्याला बोंड आली होती. पिशवीत अफूच्या झाडांची तोडून ठेवलेल्या बोंडांचे पिशवीसह वजन एक किलो४००ग्रॅम भरले. त्या अंमली पदार्थ अफूचा बाजारभावानुसार २ लाख ७७ हजार २०० रुपयांचा किमतीचा माल जप्त केला. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल वैभव सावंत यांनी दिली आहे. सुरेश पवार याच्यावर लोणंद पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास महिला पीएसआय एस.एन. पवार करीत आहेत.गेल्या दोन महिन्यात पोलिसांनी अफू लागवड केलेल्या व्यक्तींवर केलेली ही दुसरी कारवाई आहे. माण तालुक्यात कांद्याच्या पिकामध्ये अफूची लागवड केल्याची माहिती उघड झाली होती. त्यावेळी साधारण पाच लाख रुपयांचा अमली पदार्थ अफूचा माल जप्त केला होता. ही घटना ताजी असतानाच मुळीकवाडी (ता. फलटण) येथे दुसरी घटना उघडकीस आली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. नगदी कांदा पिकांना दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत अडकला आहे. त्यातच काहीजण आर्थिक लाभाकरिता अमली पदार्थ अफूची लागवड करत आहेत की काय? असा प्रश्न उभा राहत आहे.दरम्यान, पोलिसांनी शेतकऱ्यांनी या प्रकारापासून दूर राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. शेतकरी कोणत्या कारणामुळं अफूच्या शेतीकडे वळत आहेत याचा शोध घेण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here