सोलापूर: जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शेतात लिंबूची लागवड करून एकरी दहा लाखांचे उत्पादन केले आहे. अमोगसिद्ध कुंभार आणि बसवराज कुंभार यांनी एका एकरात जवळपास २५० रोपांची लागवड केली आहे.अडीचशे रोपांमधून हजारो लिंबूचे उत्पन्न होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात लिंबाचे भाव वाढल्यानं त्यांना मोठा फायदा होत असल्याची माहिती मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) येथील कुंभार यांनी दिली. लिंबाची एक बॅग दहा हजार रुपयांना विकली जात आहे.कागदी लिंबाला अधिक मागणी असल्याने ,सोलापुरातील कागदी लिंबू कोल्हापूर,सांगली ,सोलापूर आदी जिल्ह्यात विकली जात आहेत.बाजारात एक कागदी लिंबू जवळपास १० रुपयांना विकत मिळत आहे.चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठी लिंबू शेती हा एक उत्तम पर्याय आहे. तर लिंबू शेती करून कमीत कमी खर्चात जास्त नफा मिळतो. आपल्या आरोग्यासाठी लिंबू सेवन करणे हे खूप चांगले मानले जाते, असं कुंभार भावंडांनी सांगितलं.
लिंबाची लागवड करण्यासाठी २० ते ४० सेंटीग्रेड तापमानाची आणि ७५ ते २०० सें.मी. पर्जन्यमान असलेल्या भागात लिंबाची लागवड चांगली होत असल्याची माहिती कुंभार यांनी दिली.लिंबामध्ये व्हिटॅमिन सी हे समृद्ध फळ आहे. तर, शेतकऱ्यांनी लिंबू लागवड शास्त्रोक्त पद्धतीने केल्या भरघोस उत्पादन घेता येऊ शकते, असं ते म्हणतात. लिंबू लागवडीसाठी जमिनीचे पीएच मूल्य ५.५ ते ६.५ दरम्यान असावे.लिंबू हे सर्व प्रकारच्या सुपीक जमिनीत घेतले जाऊ शकते.शेतातील चिकणमाती उत्पादनासाठी चांगली आसते. जुलै ते ऑगस्ट या दरम्यान लिंबाची रोपे लावण्यासाठी योग्य वेळ असतो.तर लिंबाची लागवड करण्यात आधी जमीन दोन-तीन वेळा खोल नांगरट करून घ्यावी.लिंबांच्या सुधारित जाती मध्ये कागदी लिंबू, गोड लिंबू ,बारामासी या जाती आहेत. लिंबांच्या झाडांना उन्हाळ्यात १० दिवस आणि हिवाळ्यात २० दिवसांच्या अंतराने पाण्याची गरज भासते.

काही दिवसांचं नाही, हे तर काही तासांचं सरकार, सत्तेत येताच सगळ्यांची मोजमापं करणार: आदित्य ठाकरे

आरोग्यदायी द्राक्षं, पुण्यातील कानडे बंधूंचा भन्नाट प्रयोग; वादळी वाऱ्यातही बहरतं पीक

लिंबांच्या झाडाची काळजी कशी घ्यावी?

मंद्रुप येथील शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त माहिती दिली. लिंबू विविध कीटक आणि रोगांना बळी पडतात. त्यामुळे लिंबू बागायतीसाठी वेळेवर रोगाचे व्यवस्थापन करणेही अत्यंत आवश्यक आहे.लिंबू पिकावर रोगांमध्ये कॅन्कर, ओले रॉट रोग, लिंबू तेल आणि मंद कासेचे रोग हे रोग आढळून येतात.लिंबूच्या बागेतून अनेक वर्षे फळे मिळू शकतात, असं बसवराज कुंभार यांनी सांगितलं.

धक्कादायक! नवा बॉयफ्रेंड बनवल्याने प्रियकर भडकला, भेटण्याच्या बहाण्याने प्रेयसीचा काढला काटा

उष्णता वाढल्याने लिंबूच्या मागणीत वाढ झाली

एप्रिल पासून वातावरणातील उष्णताही वाढली आहे. शीतपेये, लिंबूपाणी पिण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात अचानक लिंबांची मागणी वाढली आहे. घाऊक बाजारात २०० ते ३०० रुपये शेकडा या दराने लिंबू मिळत आहे. घाऊक बाजारात दर वाढल्याने लगेचच किरकोळ बाजारात लिंबू पाच रुपये एक या दराने विकले जात आहेत.

पाणीटंचाईनं घेतला ८ वर्षांच्या अंजलीचा बळी, ७० फूट खोल विहिरीत पडली, आई-वडिलांचा टाहो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here