नागपूर : नागपूरकरांसाठी गुड न्यूज आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाने आज मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर मेट्रो मार्गिका टप्पा- २ ला राज्य मंत्रिमंडळाने सुधारित मान्यता दिली आहे. हा याद्वारे ४३.८० किमी अंतराची मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार आहे. नागपूर मेट्रो २ चा एकूण प्रकल्प खर्च ६,७०८ कोटी रुपयांचा सुधारित खर्च आहे. ज्या अंतर्गत ४३.८ किलोमीटर अंतराची मार्गिका उभारण्यात येईल.( लांबीची मेट्रो लाइन बांधली जाणार आहे). हा प्रकल्प पाच वर्षांत म्हणजे २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या या दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील चार मार्गांचा आणखी विस्तार करण्यात आला आहे.

यामध्ये मार्गिका क्रमांक १-ए मिहान ते एमआयडीसी ईएसआर (१८.६५ किमी.). मार्गिका क्रमांक २- ए ऑटोमेटीव्ह चौक ते कन्हान नदी (१३ किमी). मार्गिका क्रमांक ३ए लोकमान्य नगर ते हिंगणा (६.६५किमी). मार्गिका क्रमांक ३-ए – प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर (५.५० किमी) असे मेट्रो मार्ग असतील. जानेवारी २०१४ मध्ये नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा एक प्रकल्प राबवण्यास सुरुवात झाली होती. यामध्ये ४०.०२ किमी लांबीचा मेट्रो मार्ग आणि ३२ स्थानके उभारण्यात आली. सध्या मेट्रो खापरी ते ऑटोमोटिव्ह चौक आणि उज्ज्वल नगर ते लोकमान्य नगर पर्यंत धावते.

शिवशाही बसला अचानक आग, १६ प्रवासी थोडक्यात बचावले, नागपूर अमरावती महामार्गावरील घटना
मेट्रो-2 प्रकल्पामध्ये सध्या खापरीपर्यंत धावणारी मेट्रो बुटीबोरी शहरापर्यंत धावेल. सध्या मेट्रो ऑटोमोटिव्हपर्यंतची मेट्रो कन्हान शहरापर्यंत धावणार आहे. सध्या प्रजापती नगरपर्यंत धावणारी मेट्रो ही कापसीपर्यंत धावणार आहे. आणि सध्या लोकमान्यनगरपर्यंत धावणारी मेट्रो हिंगणा गावापर्यंत धावेल, असा हा मेट्रोचा विस्तार होणार आहे.
Nagpur : एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; घराबाहेर खेळत होत्या, तेवढ्यात…
विशेषतः बुटीबोरी आणि हिंगणापर्यंत मेट्रोच्या या विस्ताराने प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे. कारण बुटीबोरी आणि हिंगणा हे दोन्ही औद्योगिक क्षेत्र आहेत आणि या ठिकाणी असलेल्या विविध कंपन्यांमध्ये नागपूर शहरातील कर्मचारी मोठ्या संख्येने ये-जा कारतात.

तरुणाची दारुच्या नशेत संजय राऊतांना धमकी, तरी सरकार शांत बसणार नाही : देवेंद्र फडणवीस

नागपूर मेट्रो-2 प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती नागपूर मेट्रोने दिली आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातून शहरातील अनेकांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. दुसऱ्या टप्प्यातही अशाप्रकारे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. स्टेशनवरील प्रॉपर्टी डेव्हलपमेंटमधून दुकाने लावण्याची संधी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here