भिंड : मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. भावा-बहिणीचे भांडण झाल्यानंतर बहिणीने बहिणीने चायनीज मोबाइल गिळून टाकला. मोबाइल गिळमारी ही बहीण १८ वर्षांची आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी मुलीला ग्वाल्हेरच्या जयारोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या पोटातील फोन सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या घटनेने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. भावा-बहिणीचे भांडण सुरू झाल्यानंतर बहिणीचा राग आला आणि तो वाढत गेला. त्या रागाच्या भरात तिने मोबाइल फोन गिळला. जयारोग्य रुग्णालयात डॉक्टरांनी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.रागाच्या भरात बहिणीने मोबाइल गिळताच मुलीच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. यानंतर तिला उलट्या होऊ लागल्या. मुलीची अवस्था पाहून तिच्या कुटुंबीयांनी वेळ वाया घालवला नाही. त्यांनी तिला ग्वाल्हेरच्या जयारोग्य रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉ. प्रशांत श्रीवास्तव, डॉ. प्रशांत पिपरिया आणि डॉ. नवीन कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली कुशल डॉक्टरांचे पथक कामाला लागले.

धक्कादायक! नवा बॉयफ्रेंड बनवल्याने प्रियकर भडकला, भेटण्याच्या बहाण्याने प्रेयसीचा काढला काटा
यानंतर मुलीचे अल्ट्रासाऊंड, एक्स-रे आणि सीटी स्कॅनसह इतर तपासण्या सुरू करण्यात आल्या. एंडोस्कोपी किंवा लेप्रोस्कोपीद्वारे फोन सुरक्षितपणे काढता आला नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या पोटातील फोन सुरक्षितपणे काढण्यासाठी शस्त्रक्रिया पथकाने जवळपास दोन तास अथक परिश्रम घेतले. आव्हानात्मक परिस्थितीत ऑपरेशन यशस्वी झाले असून पोटातून फोन सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. कुशवाह यांनी सांगितले.

दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक, भीषण अपघातात पोलीस कर्मचारी ठार, क्षणात होत्याचे नव्हते
ऑपरेशन दरम्यान मुलीला दहा टाके पडले. आता तिची प्रकृती स्थिर आहे. तिला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. दोन दशकांहून अधिक काळाचा अनुभव असलेले डॉ. कुशवाह यांनी या अभूतपूर्व घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. आमच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत आम्हाला अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले नव्हते, असे डॉ. कुशवाह यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. लहान मुलांना स्मार्टफोन देताना काळजी घेण्याच्या महत्त्वावर त्यांन बोलताना भर दिला.

पोलीस कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा; बंदूक हाताळताना अचानक दाबला गेला ट्रिगर, गोळी सुटली आणि…
तसेच पालकांनी आपल्या पाल्याला अशी उपकरणे देण्यापूर्वी त्यांची परिपक्वता आणि जबाबदारीचा विचार करावा असे आवाहन त्यानी केले आहे. सर्जिकल टीमला निवासी शल्यचिकित्सक डॉ अश्विनी पांडे आणि डॉ सुरेंद्र चौहान यांनी मदत केली आहे. त्यांच्या मदतीने हे ऑपरेशन यशस्वी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here