गुवाहाटी: IPL 2023 च्या ८ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करन्याचा निर्णय घेतला. मात्र, राजस्थानने जशी अपेक्षा केली होती गोलंदाजांना तशी सुरुवात करता आली नाही. याचाच परिणाम पंजाब किंग्जचे सलामीवीर फलंदाज प्रभसिमरन सिंग आणि शिखर धवन यांनी धमाकेदार सुरुवात केली. प्रभसिमरनने अवघ्या ३८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर शिखर धवन ५६ चेंडूत ८६ धावा करून नाबाद राहिला. अशाप्रकारे पंजाब संघाने निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून १९४ धावांची मोठी धावसंख्या उभी केली.फलंदाजीत कमाल दाखवल्यानंतर आता पंजाबच्या गोलंदाजी वेळ होती. पंजाबच्या डावाच्या पहिल्याच षटकात सॅम करन आला. त्याचवेळी राजस्थानने सलामीच्या फलंदाजीत आपली रणनीती बदलत रविचंद्रन अश्विनसह यशस्वी जैस्वालसह मैदानात उतरवले. जैस्वालने पहिल्या चेंडूवर स्ट्राईक घेतली. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा विकल्या गेलेला सॅम करनने पहिला चेंडू टाकला आणि यशस्वी जैस्वालने चाबूक शॉट मारत चेंडू स्टँडमध्ये पोहोचवला. जैस्वालचा हा शॉट फक्त शॉट नव्हता. आपल्या खेळीने सॅम करन किती नाराज होता हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. मात्र, यानंतर जयस्वालला आपला डाव जास्त पुढे नेता आला नाही आणि तो ११ धावा करून बाद झाला.

मार्क वूड ठरला IPL 2023 मधील ५ विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज !

सॅम हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

इंग्लंडचा उदयोन्मुख स्टार ऑलराऊंडर सॅम करन हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएल २०२३ च्या लिलावात पंजाब किंग्ज संघाने त्याच्यावर १८.५ कोटींची मोठी बोली लावून सॅमचा आपल्या संघात समावेश केला आहे. सॅमने २०१९ मध्येच पंजाबसाठी आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच वर्षी त्याने दिल्लीविरुद्ध शानदार हॅट्ट्रिक घेत खळबळ उडवून दिली होती.

वडील इलेक्ट्रिशियन, क्रिकेट किटसाठी उधारी; कोचचा आधार, आता मुलाची IPL मध्ये धडाकेबाज कामगिरी
पंजाबची टीम सोडल्यानंतर सॅम करनला चेन्नई सुपर किंग्सने विकत घेतले. सॅमने सीएसकेसाठीही दमदार खेळ दाखवला होता. मात्र, मिनी लिलावापूर्वी सीएसकेनेही त्याला सोडण्याचा निर्णय घेतला होता. जरी लिलाव झाला तेव्हा सीएसकेने सॅम करनला आपल्या संघात परत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते पंजाब किंग्जसमोर लिलावात टिकू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here