नवी दिल्ली: आज बुधवारी, ५ ऑगस्ट या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन (Ram Mandir Bhoomi Pujan)करत आहेत. यानंतर मंदिर निर्मितीचे काम सुरू होणार आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या काही तास आधी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने ट्विट केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकाल अन्यायकारक असल्याचा उल्लेख करत बोर्डाने बाबरी मशीद होती आणि ती कायमस्वरूपी मशीदच राहील, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या वेळी बोर्डाने मशिदीचेही उदाहरण दिले आहे.

आपल्या ट्विटमध्ये म्हणते, ‘बाबरी मशीद होती आणि नेहमीच मशीदच राहील. हागिया सोफिया याचे मोठे उदाहरण आहे. अन्यायपूर्ण, दमनकारी, लज्जास्पद आणि बहुसंख्यंकांचे तुष्टीकरण करणाऱ्या निर्णयाद्वारे जमिनीवर झालेले पुनर्निर्माण हे बदलू शकणार नाही. दु:खी होण्याची आवश्यकता नाही. कोणतीही स्थिती कायमस्वरूपी राहत नाही.’

वाचा- हागिया सोफियाचे पुन्हा मशिदीत झाले रुपांतर
१५०० वर्षे जुना असलेला वारसा असलेल्या आणि यूनेस्कोच्या जागतिक वारशाच्या यादीत समावेश असलेल्या हागिया सोफिया संग्रहालयाबाबत मोठा बदल करण्यात आला. गेल्याच महिन्यात जुलैमध्ये तुर्कस्थानचे राष्ट्रपती रेचेप तैय्यब एर्दोगन यांनी हे ऐतिहासिक संग्रहालय पुन्हा मशिदीत रुपांतरीत केले आहे. सन १४३४ मध्ये हागिया सोफिया या मशिदीचे रुपांतर संग्रहालयात करण्यात आले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here