मुंबई : आयपीएल २०२३ मध्ये बुधवारी गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना रंगला. यावेळी रविचंद्रन अश्विनने २०१९ मध्ये जोस बटलरला नॉन-स्ट्रायकर एंडला रनआऊट केल्याच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. कारण, आपल्या सातव्या षटकातील चौथा चेंडू टाकण्याआधी अश्विन मध्येच थांबला आणि पंजाब किंग्जचा कर्णधार आणि सलामीवीर शिखर धवनकडे त्याने कटाक्ष टाकला. त्यामुळे धवन जरासा मागे सरकला. त्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटले. पण हा प्रकार घडताच कॅमेरा जॉस बटलरकडे वळला आणि आयपीएल चाहते फ्लॅशबॅकमध्ये गेले.अश्विनने गब्बर धवन आणि जोस बटलरला एकप्रकारे चेतावनी दिली, की “मी हा चित्रपट आधी पाहिला आहे”. २०१९ च्या आयपीएल दरम्यान, त्यावेळी पंजाबकडून खेळत असलेल्या अश्विनने राजस्थान रॉयल्सच्या बटलरला नॉन-स्ट्रायकर एंडला धावबाद केले होते. या घटनेमुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. सोशल मीडियावर याविषयी चर्चा रंगताना दोन गट पडले होते.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने बुधवारी गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या संघाच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.

पाहा व्हिडिओ :

पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्याला चांगली सुरुवात केली. सलामीला उतरलेल्या प्रभसिमरन सिंगने ३४ चेंडूत ६० धावा ठोकल्या, तर त्याच्या साथीला असलेल्या शिखर धवनने अर्धशतक झळकावले.

धोनीचा सिक्सर पाहून गौतम झाला ‘गंभीर’, नेटिझन्स म्हणतात, भावा इतका का हर्ट झालास?
याआधी पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर सात धावांनी विजय मिळवून आयपीएल मोहिमेची जबरदस्त सुरुवात केली, तर राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादवर ७२ धावांनी विजय मिळवून शानदार आरंभ केला होता. दोन्ही संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल न करता मैदानात उतरले.

बायकोला छेडणाऱ्या बिझनेसमनला भर स्टेडियममध्ये तुडवलं, शाकिब अल हसनची रोमांचक प्रेम कहाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here