अकोला : महाराष्ट्राला हादरवणारी अत्याचाराची घटना अकोल्यातून समोर आली आहे. अंध पतीच्या समोरच अंध पत्नीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमरावतीहून मुलीच्या भेटीसाठी दिग्रसला जात असताना मदतीच्या बहाण्याने नराधमाने हे पाशवी कृत्य केले. विरोध करणाऱ्या पतीला गळा दाबून बाजूला बसवत तीन वेळा महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.विदर्भात अकोला शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर अंध महिला आपल्या पतीसह रात्री पावणे आठ वाजता बसमधून खाली उतरली. रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना वाडेगाव इथे जाण्यासाठी जुन्या बस स्थानकावर जायचं होतंय. बस अर्धा तास उशिरा असल्यामुळे आणि त्यातच वाडेगाव परिसरात पाऊस सुरू असल्याने त्यांना तिथे जाणे शक्य नव्हतं. त्यामुळे रेल्वे स्थानकावर रात्रीचा मुक्काम करायचं दोघांचं ठरलं.

त्यावेळी पत्ता विचारण्यासाठी मदतीचा हात मागितलेल्या एका व्यक्तीनेच दोघांनाही अकोट फैल परिसरात नेलं. दोघंही अंध असल्याच्या संधीचा फायदा घेत आरोपीने महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तुझा आणि तुझ्या पतीचा चाकू भोसकून खून करून टाकणार, अशी धमकी देत तब्बल तीन वेळा तिच्यावर जबरी अत्याचार केल्याची माहिती आहे. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अत्याचार करणारा व्यक्ती अटकेत आहे.

काय आहे संपूर्ण घटना?

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा भागात अंध दाम्पत्य राहतं. हे दोघेही जन्मतःच आंधळे आहेत. त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. मुलगी लहानपणापासूनच अकोला जिल्ह्यातील वाडेगाव (दिग्रस) इथे आजीकडे राहायची.

मुलीच्या भेटीसाठी दोघेही ३१ मार्च रोजी दुपारी तीन वाजता परतवाडा बस स्थानकावरून अकोल्यात येण्यासाठी निघाले. रात्री पावणेआठ वाजता अकोल्या मध्यवर्ती बस स्थानकावर बस पोहोचली आणि दोघेही खाली उतरले. त्यानंतर वाडेगावला जाण्यासाठी जुन्या बस स्थानकावरून दुसरी बस लागते. या बस स्थानकाचा पत्ता विचारण्यासाठी त्यांनी एका अज्ञात व्यक्तीला मदतीची हाक मागितली.

त्यानंतर तो व्यक्ती दोघांनाही घेऊन जुन्या बस स्थानकावर आला. येथील वाडेगाव बस संदर्भात चौकशी कक्षात विचारणा केली असता, बस पंक्चर असल्यामुळे अर्धा तास उशीर लागणार असं सांगण्यात आलं. त्यात अंध दाम्पत्यमधील महिलेने तिच्या आईला फोनवर आम्ही दिग्रसला येत असल्याची कल्पना दिली. आता दिग्रस परिसरात पाऊस सुरू आहे, तुम्हा दोघांना पोहोचायला रात्र होणार, त्यामुळे उद्या सकाळी या असं घरच्यांनी सांगितलं. त्यानंतर दोघांनीही रेल्वे स्टेशनवर रात्र काढण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान या सर्व गोष्टी मदतीसाठी सोबत आलेला व्यक्ती गांभीर्याने ऐकत होता. त्यानंतर या दाम्पत्याने त्याच व्यक्तीला रेल्वे स्थानक कुठे आहे? यासंदर्भात विचारलं. रात्रीची वेळ असल्याने तुम्ही कुठे फिरणार, चला मीच तुम्हाला रेल्वे स्थानकावर घेऊन जातोय. असे सांगून त्याने एक रिक्षा बोलावली आणि दोघांनाही सोबत घेऊन गेला. त्यानंतर रिक्षा वाटेतच बंद पडली आणि त्याने पुढे जायला नकार दिला.

मग तिघे जणे पायी चालत रेल्वे स्थानकाच्या मार्गाने रवाना झाले. परंतु सोबत असलेल्या त्या व्यक्तीने रेल्वे स्थानकावर या दोघांना न नेता एका खुल्या मैदानात घेऊन गेला. आणि तिथे अंध महिलेला आणि तिच्या पतीला धमकावून जीवे मारण्याची धमकी देऊ लागला.

इतकंच नव्हे तर अंध महिलेवर अत्याचार केला. हातात चाकू घेऊन तुझ्या पतीला ठार मारून टाकेल, अशी धमकी देत पतीसमोरच १५ ते २० मिनिटाच्या अंतराने तब्बल तीन वेळा महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे

या सर्व गोष्टींना पतीने विरोध केला असता पतीचा गळा दाबून त्याला साईडला बसून ठेवले. आणि तिला उचलून नेत परत तिच्यावर काही अंतरावर अत्याचार केला. दरम्यान पती डोळ्यांना अंध असल्यामुळे तो या गोष्टींना विरोध करू शकला नाही.

स्ट्राँग बनण्याचं नाटक आता होणार नाही, बाय… २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी आयुष्य संपवलं
रात्री बाराच्या नंतर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने दोघांनाही रिक्षात बसून रेल्वे स्थानकाकडे पाठवून दिले, आणि दोघेही दिग्रसला दुसऱ्या दिवशी पोहोचले आणि सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. काल सकाळी पती-पत्नी आणि नातेवाईक सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि घडलेला सर्व प्रकाराची तक्रार नोंदवली.

अल्पवयीन मुलीचा ५० हजारात सौदा; मनसे म्हणाली, ‘जिथे गरज पडेल तिथे दांडा नक्की बाहेर काढू!’

अत्याचार करणारा नराधाम अटकेत

घटनेचे गांभीर्य पाहता सिव्हिल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी बस स्थानक परिसर तसेच जुन्या बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. आणि सीसीटीव्हीच्या आधारावर त्याची ओळख पटली आणि लगेच त्याला अटक केली. गुलाम रसूल शेख मतीन (वय २६ वर्ष राहणार सज्जाद हुसेन प्लॉट भगतवाडी, अकोला) असं अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. आज या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस त्याची कोठडीची मागणी करणार आहेत.

चहा घेतला, खोलीत गेला… हळदीच्या दिवशीच डॉक्टरने स्वतःला संपवलं, लग्नघरात शोककळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here