राजीव जैन आता श्रीमंतांच्या यादीत
फोर्ब्सने अलीकडेच जगातील श्रीमंतांची यादी जारी केली, ज्यात राजीव जैन यांचाही प्रथमच समावेश करण्यात आला. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार जैन यांच्याकडे एकूण $२०० दशलक्ष म्हणजेच १,६४,१०,७०,००,००० रुपयांची संपत्ती आहे. GQG पार्टनर्सच्या अध्यक्षांचा पहिल्यांदाच फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला असून त्यांची संपत्ती १०० दशलक्ष डॉलर्सच्या पार आहे.
अदानींना दिला मदतीचा हात
हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल समोर आल्यापासून अडचणीत सापडलेल्या गौतम अदानी आणि त्यांच्या अदानी समूहावर राजीव जैन यांनी विश्वास दाखवला आणि त्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले. जैन यांच्या कंपनीने अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी एंटरप्रायझेसमध्ये गुंतवणूक केली, जी अदानींसाठी लाइफलाइन ठरली. यानंतर उर्वरित गुंतवणूकदारांचा देखील अदानी समूहावर विश्वास वाढला. अदानी समूहातील आपल्या गुंतवणुकीबाबत राजीव जैन म्हणाले की, अदानींच्या ज्या शेअर्समध्ये त्यांनी पैसे गुंतवले आहेत ते मल्टीबॅगर ठरतील.
जैन यांनी गुंतवणुकीवर पाच वर्षात १०० टक्के परतावा मिळण्याची खात्री व्यक्त केली. विशेष म्हणजे एकीकडे अदानी समूहाच्या कंपन्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना जैन यांनी विश्वास दाखवत आपला पैसा गुंतवला. त्यांनी म्हटले की अदानींच्या कंपन्यांचे मूल्य त्यांच्या मालमत्तेवरून दिसून येते. दुसरीकडे, फोर्ब्सच्या ताज्या यादीत गौतम अदानी स्वतः खूप खाली घसरले आहेत. फोर्ब्सच्या २०२३ अब्जाधीशांच्या यादीत अदानी २४व्या क्रमांकावर असून एकेकाळी ते जगातील टॉप ३ श्रीमंतांमध्ये विराजमान होते.
‘माझ्या आईला फोर्ब्स काय असतं कळत नाही, पण लेकरू मोठं त्याचं समाधान आहे’