म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यात आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी सागरी किनारा मार्गांचे (कोस्टल रोड) काम नव्या नियोजनानुसार पूर्ण करण्यासाठी तब्बल दीड हजार कर्मचारी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पातील कर्मचाऱ्यांची संख्या आता चार हजारांवर गेली असून हा रस्ता जून, २०२४पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाचे एकूण ७३ टक्के काम पूर्ण झाले आहे.प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान १०.५८ किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. या रस्त्याचे काम डिसेंबर, २०२३पर्यंत पूर्ण होणार होते. मात्र वरळीजवळील पुलाच्या कामातील बदलांमुळे कामाची व्याप्ती वाढल्याने हे काम किमान जून, २०२४पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे.
या पार्श्वभूमीवर कामगारांची संख्या वाढवण्यात आल्याचे प्रशासनकडून सांगण्यात आले. दुसऱ्या बोगद्याचे काम ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून पुढील पंधरा दिवसात शिल्लक १५० मीटरचे काम पूर्ण होणार आहे. वरळीजवळ या पुलाचे काम वगळता इतर कामे डिसेंबर, २०२३पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यानंतर विजेचे खांब बसवणे, सीसीटीव्ही केबल टाकणे, सिग्नल रंगरोटी यासह विविध कामांसाठी सुमारे दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. यानंतर जूनपर्यंत हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत येईल, अशी माहिती प्रकल्पाच्या संबधित अधिकाऱ्याने दिली आहे.

पर्यावरणस्नेही प्रकल्प
या प्रकल्पात ७० हेक्टर पर्यावणस्नेही ठरणार आहे. ८५६ वाहनांच्या पार्किंगलह, प्रसाधनगृह, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, फुलपाखरु उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलिस चौकी, बस थांबे, पस्ता ओलांडण्यासाठी भूमिगत फुटपाथ, जेट्टी अशा नागरी सुविधा मिळणार आहेत.
जोपर्यंत अयोध्येत मंदिर उभारणार नाही तोपर्यंत ‘राम’ नाम लिहितच राहणार