मुंबई: महाराष्ट्रात मुंबईत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. काही खासगी रुग्णालयांकडून करोनाबाधित रुग्णांची लूट सुरू आहे. दुसरीकडे करोनावरील उपचारासाठी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एक इंजेक्शन १ लाख रुपयांना विकले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिल्लीहून आलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून १५ इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.

करोनावरील उपचारासाठी अद्याप लस तयार झालेली नाही. मात्र, केंद्र सरकारने डॉक्टरांच्या सल्ल्याने आपत्कालीन परिस्थितीत काही औषधे आणि इंजेक्शनचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. () हे इंजेक्शन रुग्णांना दिले जाते. मात्र, या इंजेक्शनचा मुंबईत काळाबाजार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. डीसीपी अकबर पठाण यांनी सांगितले, की इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी आझम नसीर खान या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १५ इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.

वरिष्ठ निरीक्षक महेश देसाई, संजीव गावडे आणि सुधीर जाधव यांच्या पथकाला याबाबत खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. दिल्लीहून एक व्यक्ती मुंबईत इंजेक्शन विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे त्यांनी सांगितले होते. क्राइम ब्रँचने खबऱ्यांमार्फत आरोपीचा मोबाइल क्रमांक मिळवला. त्यानंतर बनावट ग्राहक बनून त्याच्याशी संपर्क साधला. आम्हाला दोन इंजेक्शन तात्काळ हवे आहेत. कुटुंबातील दोन जणांना ते द्यायचे आहेत, असे त्याला सांगण्यात आले. त्यावर एका इंजेक्शनची किंमत एक लाख रुपये असल्याचे आरोपीने सांगितले. त्यानुसार व्यवहार ठरला. आरोपी इंजेक्शन घेऊन आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे १५ इंजेक्शन सापडले. ४० हजार रुपयांचे इंजेक्शन एक लाख रुपयांना विकत होता.

आझमची चौकशी केली असता, तो मूळचा उत्तराखंडमधील काशीपूरचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली. दिल्लीहून त्याला कुणीतरी इंजेक्शन विकण्यासाठी मुंबईत पाठवले होते. हे इंजेक्शन स्वित्झर्लंडहून भारतात एका बड्या कंपनीद्वारे मागवण्यात येते. त्यानंतर ते वितरीत केले जाते, अशी माहिती आझमने दिली. क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत केवळ तीन ते चार वितरकांनाच हे इंजेक्शन विकण्याचा परवाना मिळाला आहे. त्यासाठीही कठोर अटी आहेत. मात्र, मुंबईत सर्रासपणे या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here