ब्लूमबर्गसोबतच्या संभाषणात जैन म्हणाले की, अदानी समूहाबाबत हिंडेनबर्गच्या अहवालामुळे मला फारसा त्रास झाला नाही. 2२४4 जानेवारीला आलेल्या या अहवालात अदानी समूहावर शेअर्सच्या किमतीत छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला, जे गौतम अदानींनी थेट फेटाळून लावले.
GQG पार्टनर्सची खरेदी
अलीकडच्या संकट काळात GQG पार्टनर्स अदानींच्या मदतीला धावले आणि अदानी ट्रान्समिशनचे २.८४ कोटी शेअर्स ६६८.४ रुपये, अदानी एंटरप्रायझेसचे ३.८७ कोटी शेअर्स १,४१०.८६ रुपये, अदानी पोर्ट्सचे ८.८६ कोटी शेअर्स ५९२.२ रुपये आणि अदानी ग्रीन एनर्जीने प्रति शेअर ५०४.६० रुपये दराने ५.५६ कोटी शेअर्स खरेदी केले होते.
अदानींचे शेअर्स उसळी घेणार?
कोळसा खाण संपत्ती, डेटा सेंटर्स आणि मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये अदानी समूहाची बहुसंख्य भागीदारी मजबूत स्थिती दर्शवते, असे जैन यांनी म्हटले. विमानतळाची किंमत कंपनीपेक्षा जास्त होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. त्याची जमीन आशियातील सर्वात महागड्या रिअल इस्टेट मालमत्तेत समाविष्ट आहे. अदानी ग्रुपवरील हिंडेनबर्गच्या अहवालाने त्यांना फारसा फरक पडत नसल्याचे त्यांनी म्हटले.
त्यांनी म्हटले की, “अहवालात म्हटले आहे की त्यांच्याकडे ७५% हून अधिक हिस्सेदारी आहे. ही फसवणूक आहे का? जीक्यूजी पार्टनर्समध्ये जैन यांचा ६९% हिस्सा आहे. २०१६ मध्ये त्यांनी या कंपनीची स्थापना केली. दरम्यान, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडद्वारे (APSEZ) संचालित नऊ बंदरांवर मालवाहतूक 31 मार्च रोजी संपलेल्या शेवटच्या आर्थिक वर्षात ९% वाढली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले की मार्चमध्ये कंपनीने सुमारे ३२ दशलक्ष टन माल लोड आणि अनलोड केला, जो वार्षिक आधारावर ९.५% जास्त आहे. विशेष म्हणजे जुलै २०२२ नंतर प्रथमच आकडा तीन कोटी टन पुढे पोहोचला आहे.