पुणे : लग्नाची बोलणी करण्याची आहेत, अशी बतावणी करून तरुणीला घरी बोलावून तिला शितपेय्यातून गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार करणार्‍या मुख्य आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्ष दुर्योधन भापकर याच्यावर अश्लील वर्तन केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिली.मुख्य संशयीत आरोपी दिक्षांत गौतम चव्हाण (वय २२ वर्षे), माजी उपाध्यक्ष दुर्योधन भापकर (दोघेही राहणार- रेंजहिल्स, खडकी) आणि डॉन नावाच्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २२ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार मे २०१९ ते मार्च २०२३ दरम्यान घडला.

फूड डिलिव्हरी कंपनी की गुंडांची गँग?; डोंबिवलीत पार्सलच्या पैशावरुन ग्राहक व डिलिव्हरी बॉयमध्ये तुफान राडा
या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, दीक्षांत चव्हाण याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला लग्नासंदर्भात त्याच्या आई-वडीलांना तिच्याशी बोलायचे असल्याचे सांगून तिला घरी बोलावले. ती घरी आल्यानंतर तिला शितपेय्यातून गुंगीचे औषध दिले. ती बेशुध्द पडल्यानंतर दीक्षांतने तिच्यावर बलात्कार केला.

या अश्लिल कृत्याचे चित्रीकरणही त्याने त्याच्या मोबाईलमध्ये काढले. तिला तू माझ्याशी लग्न केले नाही तर मी तुझा काढलेला व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल करेल अशी धमकी दिली. तसेच तिला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिला बोलवून घेत लैंगिक अत्याचार केले. नंतर त्याने तिच्यासोबत लग्नास नकार दिला.

RR vs-PBKS : हेटमायर, जुरेलचे प्रयत्न वाया, नॅथन एलिसच्या झंझावाती गोलंदाजीने पंजाबचा राजस्थानवर थरारक विजय
त्यानंतर दुर्योधन भापकर याने तरूणीला व्हिडीओ माझ्याकडे आहे म्हणून तिचा हात पकडून तिला जवळ ओढून तिच्याशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तर डॉन याने तरूणीला, ‘तू कोणाच्या नादी लागते, तुला भापकर हे कोण आहेत हे माहित आहेत का ? ते तुला संपवून टाकतील’, असे म्हणून डॉनने त्याच्याजवळील पाच हजार रूपये तरूणीला देऊन तू आता एवढे पैसे तुझ्याकडे ठेवून घे व घडलेला विषय संपवून टाक, नाहीतर तुला खल्लास करून टाकायला वेळ लागणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

भावाशी भांडण झाले, मुलीने गिळला मोबाईल, दोन तास चालले ऑपरेशन, डॉक्टरही अचंबित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here