जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या तरुणाचा बुधवारी सकाळी जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रोहिदास प्रकाश सोनवणे-भिल (वय- ३५ वर्षे, रा. मोहाडी ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे रोहिदास सोनवणे हे आपल्या कुटुंबयासह वास्तव्यास होते. रविवारी संतापाच्या भरात रोहिदास हे घरातून निघून गेले होते. रोहिदास पुन्हा न घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. यादरम्यान दुसरीकडे बुधवारी सकाळी दहा वाजता जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारात स्मशानभूमीजवळील तीन पुलाजवळ एका पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली.

दुर्दैवी! स्टोव्हवर भाजी ठेवून त्या बाजूच्या घरी गेल्या, नंतर असं काही घडलं की संसारच उघड्यावर आला
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर, पोहेको लीलाधर महाजन, वासुदेव मराठे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर रोहिदास यांचा शोध असलेले नातेवाईक सुध्दा घटनास्थळी पोहचले.

घरातील कर्त्या तरुणाच्या मृत्यूने कुटुंब उघड्यावर

अंगात असलेल्या कपड्यांवरुन मृत हे रोहिदास असल्याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. मयत रोहिदास याच्या पश्चात आई, वडील, पत्नी मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरूषाच्या मृत्यूने कुटुंब उघड्यावर आले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

धक्कादायक! लग्नाची बोलणी करण्याच्या बहाण्याने घरी बोलावले, शितपेयातून गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वीच रोहिदास यांचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र नेमका मृत्यू कसा व कशामुळे झाला, हे मात्र अद्यापर्यंत कळू शकलेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर नेमका मृत्यू कसा झाला याबाबतचे कारण समोर येणार आहे. दरम्यान याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
फूड डिलिव्हरी कंपनी की गुंडांची गँग?; डोंबिवलीत पार्सलच्या पैशावरुन ग्राहक व डिलिव्हरी बॉयमध्ये तुफान राडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here