पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, सुषमा महेश नेवारे वय ३२ राहणार अजब नगर, छत्रपती संभाजीनगर असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सुषमा यांचं माहेर छत्रपती संभाजीनगर आहे त्यांचं बीकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं आहे. अभ्यासात त्या हुशार होत्या.दरम्यान सात वर्षांपूर्वी महेश नेवारे(रा.अजबनगर) यांच्याशी झाला. त्यांना सहा वर्षाचा मुलगा आहे.सुषमा यांचे पती महेश हे स्वतः एका खासगी बँकेमध्ये नोकरी करतात. सुषमा या अभ्यासात हुशार असल्यामुळे त्यांनी सीएची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून त्या सीए परीक्षेची तयारी करत होत्या सहा महिन्यांपूर्वी त्या सीएच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाल्या होत्या, यामुळे तेव्हापासून त्या तणावात होत्या. दरम्यान दोन दिवसांपूर्वी अभ्यासिकेतील दोन मुलींचा जवळ सुषमा रडत असल्याची माहिती त्यांच्या मैत्रिणींनी दिली. मात्र, रडण्याचे कारण अद्याप त्यांनी सांगितलं नव्हतं.
बुधवारी सायंकाळी जेवण करून सर्वजण झोपी गेले. सुषमा यांचे सासू-सासरे वरच्या हॉलमध्ये झोपले होते, त्यांच्यासोबत त्यांचा नातू देखील होता. महेश आणि सुषमा खालच्या खोलीत झोपलेले होते. सकाळी सहा वाजता महेश हे उठले तेव्हा सुषमा म्हणाल्या माझे पाय दुखत असल्याने मी अभ्यासिकेला जात नाही.त्यानंतर महेश हे वरच्या खोलीत गेले.यावेळी सुषमा यांनी अतून दार लावून सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
थोड्यावेळाने मुलगा खाली आला त्यानं आईला आवाज दिला पण आतून प्रतिसाद आला नाही. यामुळे त्याने शेजारच्या खिडकीतून बघितलं असता सुषमा नेवारे दोरीला लटकलेल्या दिसल्यानं त्याने आरडाओरोड केला. नातेवाईकांनी आवाज दिला मात्र सुषमा प्रतिसाद आला नाही. यावेळी नातेवाईकांनी दरवाजा तोडून सुषमा यांना तात्काळ साठी रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुषमा यांना कुटुंबीयांकडून कुठलाच त्रास नव्हता.मात्र, सुषमा यांनी आत्महत्या का केली याच कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल इंगळे करत आहेत.
घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या