अपघातात ठार झालेले तीनही युवक थोपटेवाडी (ता. पुरंदर) येथील आहेत. लोणंद -निरा रोडवर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी बस (क्रमांक एमएच २०बीएल ४१५८) व निरेकडून लोणंद निघालेली मोटारसायकल (क्रमांक एमएच १२ आरव्ही ३१५८) यांच्यात जोरदार धडक झाली.
यामध्ये मोटारसायकलवरील ओंकार संजय थोपटे, पोपट अर्जुन गायकवाड, अनिल नामदेव थोपटे (सर्व रा. पिंपरे बु. थोपटेवाडी, ता. पुरंदर) तीनही युवक जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पीएसआय गणेश माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.
अपघातातील मृत पुणे जिल्ह्यातील
मंगळवेढ्याहून पुण्याकडे निघालेल्या एसटी आणि दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. या मधील तिघेही पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिंपरे बुद्रुक थोपटेवाडी येथील आहेत. ओंकार संजय थोपटे, पोपट अर्जुन गायकवाड, अनिल नामदेव थोपटे हे दुचाकीवरुन प्रवास करत होते. सातारच्या लोणंद पोलिसांनी या घटनेनंतर तिघांचे मृतदेह रस्त्यावरुन बाजूला केले.
दरम्यान, अपघातातील वाहने बाजूला करून मृतदेह लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या अपघातामुळे ट्राफिक जाम झाले होते. वाहतूक पोलिसांनी ते सुरळीत केले. या गुन्ह्याची नोंद रात्री उशिरा लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्याचे काम सुरू होते. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती.
घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या