कोलकाता: IPL २०२३ चा ९ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (KKR vs RCB) यांच्यात खेळला जात आहे. इडन गार्डन्स मैदानावर फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी आरसीबीला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावा लागला. मुंबईविरुद्धच्या सामन्यात रीस टॉपलीला दुखापत झाली होती. त्याच्या जागी संघाने डेव्हिड विलीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला.दोन चेंडूंत दोन बळी

डेव्हिड विलीने पहिल्याच षटकात फलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. त्याने फक्त ३ धावा दिल्या. तीन षटकांनंतर केकेआरची धावसंख्या २६ धावा इतकी होती. डेव्हिड विलीने चौथ्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. त्याच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने व्यंकटेस अय्यरला त्रिफळाचित केले. अय्यरला केकेआरने आज सलामीसाठी पाठवले होते. आत घुसणाऱ्या चेंडूवर तो बाद झाला.

पत्नीचे शेजाऱ्याशी अनैतिक संबंध, पतीला कळताच तळपायाची आग मस्तकात, पुढे घडलं ते हादरवणारं
यानंतर मनदीप सिंग क्रीजवर उतरला. मात्र मनदीपलाही विलीने बोल्ड केले. यावेळी त्याचा चेंडू पडल्यानंतर बाहेर गेला. बॉलचा सामना करताना मनदीप बिट झाला आणि तो विकेटला आदळला. या षटकात त्याने एकही धाव न देता या दोन विकेट घेतल्या. विलीने पहिल्या तीन षटकात केवळ ९ धावा दिल्या. त्याच्या गोलंदाजीमुळे केकेआरचा डाव खचला.

प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाइट रायडर्स: मनदीप सिंग, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, टिम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

संतापाच्या भरात तरुण घरातून निघाला, खूप शोध घेतला, ३ दिवसांनी आली धक्कादायक बातमी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज
दुर्दैवी! स्टोव्हवर भाजी ठेवून त्या बाजूच्या घरी गेल्या, नंतर असं काही घडलं की संसारच उघड्यावर आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here