आयपीएलच्या एका डावात फिरकीपटूंच्या सर्वाधिक विकेट्स
९ – KKR vs RCB, कोलकाता, २०२३
८ – CSK vs DC, वायझॅग, २०१२
८ – CSK vs RCB, चेन्नई, २०१९
८ – CSK vs DC, चेन्नई, २०१९
आयपीएलच्या एका सामन्यात फिरकीपटूंच्या सर्वाधिक विकेट्स
१२ – KKR vs RCB, कोलकाता, २०२३
११ – KKR vs KXIP, कोलकाता, २०१२
११ – KKR vs DC, कोलकाता, २०१८
११ – CSK vs DC, चेन्नई, २०१९
आरसीबीने डावाची सुरुवात करताच दु प्लेसिस आणि विराट कोहलीने फटकेबाजी सुरु केली. त्यांच्या ५ षटकांत ४५ धावा होत्या. ५ वे षटक नरेनने टाकले आणि कोहलीला थेट क्लीन बोल्ड करत संघाला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्यानंतर चक्रवर्तीने पुढच्याच षटकात दुसऱ्या चेंडूवर फॅफला क्लीन बोल्ड केले. नंतर पुढच्या स्पेलमध्ये चक्रवर्तीने २ विकेट्स घेतल्या आणि फक्त १ धाव दिली इथून आरसीबीच्या धावांना चांगलाच ब्रेक लागला. त्यानंतर नरेनने ९व्या षटकात अजून एक विकेट घेतली ज्याचा झेल ठाकूरने टिपला.
केकेआरचा कर्णधार नितीश राणाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ८१ धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर रहमानुल्ला गुरबाज (५७ धावा) आणि शार्दुल ठाकूर (६८ धावा) यांच्या फलंदाजीचे कौतुक केले. सामन्यानंतर राणा म्हणाला, ‘गुरबाजने चांगली फलंदाजी केली आणि शार्दुलचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. रिंकू सिंगनेही ठाकूरला पूर्ण पाठिंबा दिला. नंतर १४ आणि १५ व्या षटकात नवोदित सुयश शर्माने ३ विकेट घेत आरसीबीला ९ झटके दिले. मग १८ व्या षटकात चक्रवर्तीने शेवटची विकेट घेत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.
अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं
दिल्लीचा लेगस्पिनर सुयश शर्माबद्दल राणा म्हणाला, ‘तो दिल्लीचा आहे, त्याने शानदार गोलंदाजी केली. सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती हे अप्रतिम गोलंदाज आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आजचा दिवस एकदम परफेक्ट होता. ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित शार्दुल ठाकूर म्हणाला, ‘सुरुवातीला आम्ही संघर्ष करत होतो. मला माहित नाही की मी अशी फलंदाजी कशी करू शकलो. आम्ही नेहमी नेटवर याचा सराव करतो. खेळपट्टी चांगली होती जी फलंदाजांसाठी उपयुक्त होती.’