रत्नागिरी: जिल्ह्यात गेल्या जवळपास तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरील काही ठिकाणची वाहतूक थांबविण्यात आली आहे. त्यामुळं गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटाच्या पायथ्याला असलेला बावनदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महामार्गावर गाड्यांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. ()

रत्नागिरी व सिंधुदुर्गात गेल्या ४० तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. सतत होणाऱ्या पावसामुळं काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोकणातील वीज पुरवठ्यावरही पावसाचा परिणाम झाला आहे. सर्वात मोठा फटका मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसला आहे. येथील काही ठिकाणची वाहतूक थांबवण्यात आली आहे. मात्र, त्यामुळं गावाकडे निघालेले सर्वच प्रवासी अडकून पडले आहेत.

राजापूर तालुक्यातील कोदवली, संगमेश्वरमधील बावनदी, लांजा तालुक्यातील काजळी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर, खेडमधील जगबुडी नदी, चिपळूमधील वशिष्ठी, लांजातील मुचकुंदी, संगमेश्वरमधी शास्त्री व सोनवी इशारा पातळीवर वाहत आहेत.

कोकणातील नद्यांच्या प्रवाहाची सद्यस्थिती (कंसात अनुक्रमे इशारा व धोका पातळी)

वाशिष्ठी ४.८८ मी. (५ मी. व ७ मी.)

काजळी १८.३४ (१६.५ मी व १८ मी.)

कोदवली ८.२० (४.९० मी व ८.१३ मी)

जगबुडी ६.७५ मी. (६ मी व ७ मी.)

शास्त्री ६.४० मी. (६.२० मी. व ७.८० मी.)

सोनवी ६.२० मी. (७.२० मी व ८.६० मी.)

मुचकुंदी २.४० मी. (३.५० मी व ४.५० मी.)

बावनदी ११.८० मी. (९.४० मी व ११ मी.)

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here