मुंबई (दहिसर) : डम्पर चालकाने एका आठ वर्षांच्या मुलीला चिरडल्याची घटना काल गुरुवारी दहिसर परिसरात घडली. विद्या बनसोडे असं मृत मुलीचे नाव असून या प्रकरणी दहिसर पोलिसांनी मुकेश ढाले या डम्पर चालकाला अटक केली. मुकेश दारूच्या नशेत डम्पर चालवत असल्याचे समोर आलं आहे.

दहिसरच्या रावळपाडा परिसरात विद्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास होती. विद्या ही दुपारी आईसोबत भावाला शाळेत सोडायला निघाली. भावाला शाळेत सोडून घरी परतत असताना रावळपाडा परिसरात डम्परने विद्या आणि तिच्या आईला पाठीमागून धडक दिली. आई डम्परच्या पुढील चाकाच्या बाहेरील बाजूस पडली तर विद्या चाकाखाली आली. अपघातानंतर पादचाऱ्यांनी आरडाओरड केली. मात्र, थांबण्याऐवजी त्याने डम्पर पुढे घेतला. त्यामुळे विद्या चाकाखाली चिरडली गेली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

शहाजी महाराजांच्या साडेतीनशे वर्ष जुन्या समाधीची दुरवस्था, ३.५ कोटींचा निधी गेला परत
अपघाताची माहिती मिळताच दहिसर पोलीस रावळपाडा येथे पोहोचले. पोलिसांनी डम्पर चालक मुकेशला ताब्यात घेऊन अटक केली. मुकेश कोकणी पाडा येथील खदानीत डम्पर चालवत असून त्याचा नेहमीचा रस्ता होता. मात्र, दारूच्या नशेत चालवत असल्याने त्याला रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या मायलेकी दिसल्या नाहीत.

महागाईचे चटके सोसणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा; CNG-PNG दराबाबत सरकारचा मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here