मोताळाः सकाळ सकाळ ५.३० वाजेच्या सुमारास सर्व साखर झोपेत असताना दूरध्वनी खणखणतो, तो उचलताच हॅलो, हॅलो…डॉक्‍टर, शेलापुर आरोग्य उपकेंद्राजा, तिथं गरोदर मातेला प्रसव वेदना होताहेत. तिला घेऊन तत्काळ मोताळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करा. अशा सूचना पुणे मुख्यालयातून मोताळा येथील १०८ या रुग्णवाहिकेला मिळताच गाडीवरील डॉक्‍टर व चालकनेहमी प्रमाणे आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी तत्काळ शेलापुर आरोग्य उप केंद्रात पोचतात. गरोदर मातेला गाडीत घेऊन रुग्णवाहिका मोताळ्याच्या दिशेने धावत असतांनाच गरोदरमातेच्या वेदना वाढतच जातात. रस्त्यातच सोबतचे डॉक्‍टर यांनी महिलेच्या नातेवाइकाच्या साक्षीने तत्काळ उपचार सुरू केले आणि शेलापुर- मोताळा मार्गावरील चिंचपुर फाट्यावर मातेने एका गोंडस बाळाला जन्म दिली. ही कोण्या चित्रपटातील कथा नव्हे तर मोताळा तालुक्‍यात गुरुवार दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी घडलेली ही घटना आहे.

वेळीच योग्य उपचार मिळाल्यामुळे आई व बाळ दोन्ही सुखरूप आहेत. खेड्यापाड्यावरील रुग्णांसाठी रुग्णवाहिका म्हणजे केवळ रुग्णवाहिका नाही तर ती जीवनदायीनी ठरत आहे. हे या घटनेवरून पुन्हा सिद्ध झाले आहे. गुरुवार दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ५:३० वाजेच्या सुमारास शेलापुर आरोग्य उपकेंद्र तालुका मोताळा येथे एक गरोदर माता आहे. १०८ वरून माहिती डॉ. शुभम डोंगरे यांना देण्यात आली. 108 या रुग्णवाहिकेवर डॉ. डोंगरे व चालक अंकुश वाघ यांनी तातडीने शेलापुर आरोग्य उपकेंद्र गाठत लगेच शितल आकाश बावणे या गरोदर मातेला नातेवाइकासह रुग्ण वाहिकेत घेतलं.

घराला चारही बाजूने आगीचा वेढा, आत पाच भावंड, मोठ्या ताईने धुमसत्या आगीत उडी घेत वाचवला जीव

गाडी मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने घेऊन जात असतांना मोताळा पासुन काही अंतरावर असलेल्या चिंचपुर फाट्यावर अर्ध्या रस्त्यातच गरोदरमातेला असह्य प्रसववेदना सुरू झाल्या. आई व बाळासाठी हा जीवन मरण्याचा प्रश्न असतो. प्रसव वेदना सुरू झाल्यामुळे डॉ. डोंगरे यांनी रुग्णवाहिकेत महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेत उपचार सुरू केले. त्यानंतर काही वेळेतच त्या मातेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ व आई दोघेही सुखरूप आहेत.

साताऱ्यातील अपघाताने पुरंदर सुन्न, एकुलती एक लेकरं गेली, ग्रामदैवताची यात्राही थांबली
पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोताळा येथे बाळ व आई यांना दाखल करण्यात आले. चक्क रुग्णवाहिकेत बाळाचा जन्म झाला. वेळीच योग्य उपचार केल्या मुळे आई व बाळ सुखरूप आहेत.
थोडक्यात टळला अनर्थ! बेस्टमधून प्रवास करताना प्रवाशाला दिसलं असं काही की भीतीने काळीजच गोठलं

‘मेरे रश्के कमर’ गाण्यावर कैद्याचां तुफान डान्स; मुंबई मध्यवर्ती कारागृहात मनोरंजनाच्या कार्यक्रमाची चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here