परभणी : तीन मुली असल्याने मुलगा होत नसल्यामुळे सातत्याने सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या शारिरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून एका ३३ वर्षीय विवाहितेने शेताशेजारी असलेल्या एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना पूर्णा तालुक्यातील आवई येथे घडली. पूर्णा पोलीस ठाण्यात सासरच्या ३ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखा गोविंद सोनवणे (वय ३३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मयत विवाहितेचा भाऊ अमोल आबासाहेब रासवे (रा. कोक) याने पुर्णा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून सासरच्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिंतूर तालुक्यातील कोक येथील रेखा रासवे यांचा विवाह ११ वर्षापूर्वी पूर्णा तालुक्यातील आवई येथील गोविंद किशन सोनवणे यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांना मुलगी झाली. त्यानंतर आणखी दोन मुली झाल्या. “तुला मुलगा होत नाही, मुलीच होत आहेत”, असं म्हणत सासरच्या मंडळींनी रेखाला त्रास देण्यास सुरुवात केली. या छळाला कंटाळून रेखा या कुटुंबासोबत गावाजवळील शेतामध्ये काम करत असताना त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

सेवानिवृत्तीचे वय साठीवर नेऊ नका, उलट ५८ वरून ५० वर्ष करा, मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी
पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती ग्रामस्थांनी पूर्णा पोलिसांना दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हदेव गावडे, पोनि सुभाषचंद्र मारकड, सपोनि गंगाधर गायकवाड, फौजदार पोपलवार, जमादार रमेश मुजमुले, शाम काळे यांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी किशन सोनवणे (सासरा), कमलबाई सोनवणे (सासू ), गोविंद सोनवणे (पती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होतात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेचा अधिक तपास सपोनि गंगाधर गायकवाड हे करत आहेत.

आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

विवाहित रेखा गोविंद सोनवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन पूर्णा येथील न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तीन मुलींच्या आईने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

…हा तर फक्त टीझर; पिक्चर अभी बाकी है! बँकांबाबत रघुराम राजन यांनी दिला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here