मुंबई : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) देशातील लाखो कर्जदारांना आनंदवार्ता दिली. आरबीआयने रेपो दरवाढीला तूर्तास ब्रेक लावला, ज्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून आला. भारतीय मार्केट तेजीसह बंद झाले असून अदानी समूहाच्या शेअर्सनी देखील बाजाराच्या तेजीत हात धुतले. गुरुवारी अदानी समूहाचे सर्व शेअर्स वाढीसह बंद झाले असून GQG पार्टनर्सचे सीआयओ राजीव जैन यांच्या विधानाने अदानीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.

अदानी शेअर्स मल्टीबॅगर बनणार
पुढील पाच वर्षात अदानी समूहाचे शेअर्स मल्टीबॅगर ठरतील, अशी खात्री जैन यांनी दर्शवली. त्यांनी म्हटले की, अदानी समूहाबाबत हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात काहीही फरक पडत नाही. २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्गने अदानी समूहाचा अहवाल प्रसिद्ध केला, ज्यानंतर GQG पार्टनर्सने समूहाच्या चार कंपन्यांमध्ये सुमारे १५,४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. अदानी ग्रुपच्या शेअर्सची आज काय स्थिती होती ते जाणून घेऊया.

हिंडेनबर्गचा अहवाल अन् अदानींची धडपड तरी ही व्यक्ती म्हणते, शेअर्स मल्टीबॅगर ठरू शकतात
अदानी एंटरप्रायझेसचा M-कॅप
अदानी समूहाची प्रमुख कंपनी, अदानी एंटरप्रायझेसचा शेअर गुरुवारी वाढीसह क्लोज झाला. बीएसईवर शेअर ३.२४% किंवा ५५.०५ रुपयांनी १७५२.९५ रुपयांवर बंद झाला असून BSE वर कंपनीचे मार्केट कॅप १,९९,८३६.५० कोटी रुपयांवर पोहोचले.

अदानी पोर्ट्सचा स्टॉक
अदानी पोर्टचा शेअरही गुरुवारी ०.८३ टक्के किंवा ५.३० रुपये वाढीसह ६४१.८० वर बंद झाला असून कंपनीचे मार्केट कॅप १,३८,६३७.७२ कोटींवर पोहोचले.

अदानी ‘पॉवर’ही वाढला
अदानी पॉवरचा शेअर गुरुवारी १.१० टक्के किंवा २.१० रुपयांनी वाढून १९२.१५ रुपयांवर पोहोचला. तसेच BSE वर कंपनीचे मार्केट कॅप ७४,१११.०८ कोटी रुपये होते.

Adani Shares: शेअर बाजार वाढला पण अदानी ग्रुपच्या शेअर्सचे काय हाल झालेत, पाहा एका क्लिकवर
अदानी ट्रान्समिशन अप्पर सर्किटला
अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स आज वरच्या सर्किटवर बंद झाले. ५% किंवा ४५.५० रुपयांनी शेअर ९५६.१५ रुपयांवर बंद झाला असून कंपनीचे मार्केट कॅप १,०६,६५७.८३ कोटी रुपयांवर बंद झाले आहे.

अदानी ग्रीनही अप्पर सर्किटला
अदानी ग्रीनचा स्टॉक ५ टक्क्यांनी वाढून ८५५.०५ रुपयांवर बंद होत कंपनीचे मार्केट कॅप १,३५,४४२.७० कोटी रुपयांवर पोहोचले.

अदानी टोटलमध्येही अप्पर सर्किट
अदानी टोटलचा शेअर काल पाच टक्क्यांनी वाढून ८६४.३५ रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप ९५,०६२.०८ कोटी रुपये झाले.

भारीच की! ४ रुपयाच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा रिटर्न, पाहा स्टॉक डिटेल्स
अदानी विल्मरही तेजीत
अदानी विल्मरचा शेअर गुरुवारी ३.३४% किंवा १३.२५ रुपये वाढून ४०९.५५ रुपयांवर बंद होत कंपनीचे मार्केट कॅप ५३,२२८.३४ कोटींवर पोहोचले.

NDTV अप्पर सर्किटला
अदानी समूहाने अधिग्रहित केलेल्या एनडीटीव्हीचा शेअर गुरुवारी पाच टक्के वाढून १९४.५५ रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप १,२५४.२९ कोटी रुपयांवर पोहोचले.

ACC स्टॉकही चढला
अदानी समूहाची सिमेंट कंपनी एसीसीचा शेअर गुरुवारी १.३६ टक्के किंवा २२.९० रुपयांनी १७१२.६० रुपयांवर बंद झाला. यासह कंपनीचे मार्केट कॅप ३२,१६०.४५ कोटींवर पोहोचले.

अंबुजातही तेजी
अंबुजा सिमेंटचा शेअर ०.९२ टक्के किंवा ३.५० रुपयांनी किंचित वाढीसह ३८३.४५ रुपयांवर बंद झाला. BSE वर कंपनीचे मार्केट कॅप ७६,१३९.५७ कोटी रुपयांवर बंद झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here