नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्यातील लढत जगाला माहीत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान, देशमुख लवकरच काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आशिष देशमुख लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अधिवेशन घेणार आहेत. यामध्ये शरद पवारांसह सर्व बड्या नेत्यांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे.

काही दिवसांआधी शरद पवार दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर होते, तिथे आशिष देशमुख यांनी त्यांची भेट घेतली होती. दरम्यान, पवार लवकरच त्यांच्या शेताला भेट देणार असल्याची माहितीही माजी आमदारांनी दिली होती. यानंतर देशमुख लवकरच काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत जाणार की काय, अशी चर्चा सुरू झाल्या होत्या.

सेवानिवृत्तीचे वय साठीवर नेऊ नका, उलट ५८ वरून ५० वर्ष करा, मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

हिंगणा येथे मोठ्या सभेचं आयोजन?

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत लवकरच नागपुरात राष्ट्रवादीची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आशिष देशमुख राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्याचवेळी ते हिंगणा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी सभा घेणार असल्याचे वृत्त आहे.

बैठकीत औपचारिक घोषणा होणार ?

आशिष देशमुख यांच्या टीमनेही सभेची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या हिंगणा मतदारसंघातून देशमुख यांना निवडणूक लढवायची आहे. काँग्रेसवर वारंवार आरोप केल्यानंतर पक्ष त्यांच्यावर कारवाई करू शकतो. त्यादृष्टीने ते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. या बैठकीला मोठ्या संख्येने शेतकरी व सर्वसामान्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. हिंगणा मतदारसंघात भाजपविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीकडे तगडा आणि मोठा उमेदवार नाही.हिंगणामधून राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ उमेदवाराच्या शोधात आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत आशिष देशमुख हे या मतदारसंघातुन उमेदवारीचे मुख्य दावेदार म्हणून समोर येऊ शकतात.

Weather Alert: राज्यात ४८ तासांत मुसळधार पाऊस; मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट जारी

दरम्यान, हिंगणा विधानसभा मतदारसंघ गेल्या तीन टर्मपासून भाजपच्या ताब्यात आहे. समीर मेघे हे २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत.

प्रेयसीने नकार दिल्याचा सूड, पुण्यातील नेत्यांना खंडणीसाठी धमक्या, गाडीचा नंबरही तिचाच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here