मुरादाबाद: मुलांमध्ये खेळता खेळता वाद झाला. या वादातून दोन गटांत तुफान झाली. तसेच हवेत गोळीबारही करण्यात आला. मुरादाबादमधील भगतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उदमावाला या गावात ही घटना घडली. या हिंसक घटनेत पाच जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उदमावाला गावात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. मुलांमध्ये खेळता खेळता वाद झाला होता. त्यातून दोन गट आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक करण्यात आली. त्यानंतर परवानाधारक बंदुकांमधून करण्यात आला. गोळीबार होत असल्याने गावात दहशत निर्माण झाली आहे. लोकांनी स्वतःला आपल्या घरात कैद करून घेतले. या घटनेत पाच जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दगडफेक आणि गोळीबाराच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे.

पोलीस अधीक्षक मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांमध्ये वाद झाल्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक करण्यात आली. तर गोळीबारही केला. पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. बंदुकीचे परवाने रद्द करण्यात येतील. तसेच यात सामील असलेल्या हल्लेखोरांना अटक करण्यात येईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here