Authored by रईस शेख | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Apr 2023, 5:22 pm

Nashik News : नाशिकमध्ये बसला भीषण अपघात झाला असून यात दोन जण ठार झाले आहेत. तर ९ प्रवासी जखमी झालेत. मृतांमध्ये महिला कंडक्टर आणि एका प्रवासी महिलेचा समावेश आहे.

 

st bus accident news
नाशिकमध्ये एसटीला भीषण अपघात, दोन ठार
नाशिक : सप्तश्रृंगी गडावरून मनमाडकडे निघालेल्या एसटी बसचा मतेवाडी शिवारात अपघात झाला. आज दुपारी दोन वाजता झालेल्या या भीषण अपघातामध्ये महिला वाहक जागीच ठार झाली आहे. तर एका प्रवासी महिलेचाही मृत्यू झाला आहे. अपघात १३ प्रवाशांसह १ चालक जखमी झाला आहे. वणीच्या सप्तश्रृंगीवरील चैत्र यात्रोत्सवानिमित्त जादा गाड्यांमधून एमएच १४ बीटी ०१०९ या क्रमांकाची बस सोडली होती. या बसला हा अपघात झाला. या भीषण अपघाताचे फोटो समोर आले आहेत. या अपघातात बसमधील महिला चालक सारिका लहीरे (वाहक) आणि संगीता बाळकृष्ण खैरनार (४५ रा. मनमाड) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चालक आणि ९ प्रवाशांवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. या बसमध्ये १३ प्रवाशी होते.

दळणाचा डब्बा घेऊन जात होती, घराजवळ येताच बिबट्याने झडप घातली, ७ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू
समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने कट मारल्यानंतर एसटीचा रॉड तुटला. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पिकअप-दुचाकीत विचित्र अपघात, बहीण भावाचा जीव गेला, आई-वडिलांनी बघितला लेकरांचा अंत

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here