बीड : कौटुंबिक वादातून विवाहितेचा ओढणीने गळा आवळून खून झाल्याची घटना पेठ बीड हद्दीतील युनूस पार्क परिसरात घडली. या प्रकरणात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा बनाव तिच्या पतीने केला होता. मात्र पेठ बीड पोलिसांनी केलेली चौकशी आणि मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमुळे आत्महत्येचा बनाव उघडा पडला.मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पेठ बीड भागातील तेलगाव नाका येथील मुस्कान हिचा विवाह १५ महिन्यापूर्वी माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथील शेख शाहेद शेख रूकमोद्दीन ह्याच्यासोबत झाला होता. पात्रूड येथे राहत असतांना नेहमी वाद होत होता. त्यामुळे मुस्कानच्या वडिलांनी तिला बीडमध्ये आणले होते. त्यानंतर ४ ते ५ दिवसांनी जावई शेख शाहेद हा देखील बीडमध्ये आला.

पुण्यात एसटीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी उलटली, एकाचा मृत्यू
मुस्कान आणि शाहेद दोघेही पेट बीड हद्दीतील युनूस पार्क येथे खोली भाड्याने घेऊन राहत होते. दिनांक ५ एप्रिल रोजी मुस्कान आणि तिच्या पतीमध्ये पात्रूड येथील सामान आणण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर दिनांक ६ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता शेख शाहेद याने मुस्कानच्या वडिलांना फोन करून तुमच्या मुलीची तब्येत बिघडली असून तोंडातून फेस येत असल्याचे सांगितले.

धक्कादायक! पती-पत्नीचा घरगुती वाद टोकाला; पतीने रागाच्या भरात पत्नीचा कानच उपटून काढला
मुस्कानच्या वडिलांनी व तिच्या नातेवाईकांनी तात्काळ तेथे घाव घेतली असता मुस्कान गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मुस्कानच्या देहावर, पायावर आणि हातावर जखमा आढळल्या असून तिच्या उजव्या गालाजवळ नख लागल्यासारखे दिसून आले. यावरून जावाई शेख शाहेद यानेच मुस्कानला ओढणीने गळा आवळून जिवे मारले व आत्महत्येचा बनाव केला याबाबत संशय बळावला.

फूड डिलिव्हरी कंपनी की गुंडांची गँग?; डोंबिवलीत पार्सलच्या पैशावरुन ग्राहक व डिलिव्हरी बॉयमध्ये तुफान राडा
या प्रकरणात मयत विवाहितेचे वडिल शेख जमील शेख खय्युम रा. तेलगाव नाका, बीड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख शाहेद विरुद्ध कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here