बीड:एकीकडे देशात आणि राज्यात राजकीय स्वार्थासाठी जाती धर्मात तेढ निर्माण करण्यात येत असल्याच्या घटना वाढत आहेत. समाजातील अजूनही बहुतांश लोकांना जाती धर्मापलीकडे माणुसकी हा सर्वात मोठा धर्म असल्याचे दाखवून देतात. आपल्या देशात समाजिक ऐक्य कायम राहणार असल्याचं ते कृतीतून दाखवून देतात. हिंदू मुस्लीम ऐक्याचा संदेश देण्याचा आदर्श बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा गावानं पुढं ठेवला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथे दरवर्षी प्रमाणे अखंड हरीनाम सप्ताहात मुस्लीम बांधवासाठी रोजा इफ्तारच्या पंगतीचे आयोजन करण्यात येते. यंदा देखील सर्व गावकऱ्यांनी यात सहभाग नोंदवला. हरिनाम सप्ताहात इफ्तारचं आयोजन करुन आम्ही सर्व गावकरी एक आहोत असा मोठा सामाजिक संदेश पाटोदा गावानं दिला आहे. राम नवमी ते हनुमान जयंती या दरम्यान सप्ताहाच्या आयोजनाचं हे २९ वे वर्ष आहे. हा सप्ताह निमित्त दरवर्षी असा माणूसकीचा आणि ऐक्याचा एक संदेश देणारं कार्य हे करत असतो. रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मध्यस्थानी आलेला हा सप्ताह आणि त्यात दुग्ध शर्करा योग म्हणून रमजानच्या महिन्यात इफ्तारच्या पंक्तीचं या गावात आयोजन करण्यात आलं आहे. पाटोदा गावातील ऐक्य आणि हिंदू मुस्लीम बांधवातील एक वेगळी माणुसकी दर्शवण्याचा वेगळेपणा आज महाराष्ट्रभर कौतुकास्पद ठरत आहे.

गौतमी पाटीलचा IPL मधला आवडता संघ कोणता, मुंबई इंडियन्स की CSK जाणून घ्या…

पाटोदा गावात रामनवमी पासून ते हनुमान जन्मोत्सवापर्यंत हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात येतो. या सप्ताहात कीर्तनं, काकड आरतीचं आयोजन केलं जातं. शेवटी काल्याच्या किर्तनानंतर जो महाप्रसाद वाटप केला जातो या प्रसादा दरम्यान सगळं गाव हे एकत्रित आलेलं पाहायला मिळतं. मात्र, यावेळेसच महाप्रसादाच्या वेळीच रमजान असल्याने इफ्तार पंगतीचा देखील मोठ्या आनंदात आयोजन केलं जातं.

पुण्यात एसटीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी उलटली, एकाचा मृत्यू
हिंदू आणि मुस्लीम बांधव एकत्र येत या रमजाननिमित्त आयोजित केलेल्या इफ्तार पंगतीचा आनदांत लाभ घेतात. पाटोदा गावाच्या गावकऱ्यांचा एकोपा आज अनेक गावात आदर्श ठरत आहे. या गावातील अनेक वर्षाची ही परंपरा आता बीड जिल्ह्यातील इतर गावात देखील सुरू झाली आहे. या गावातील सर्व अधिकारी, सरपंच, गावकरी विविध मान्यवर आणि नेतेमंडळी एकत्र येतात आणि हा सप्ताह आणि इफ्तार पंगत मोठ्या आनंदाने आयोजित केली जाते.

मी या जगात नसेन तेव्हा..अंबादास दानवेंची देहदानाबद्दल मोठी घोषणा, भरसभेत सर्वांचा टाळ्यांचा कडकडाट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here