Chandrapur News : आमदार म्हटलं की कार्यकर्त्यांचा गराडा आणि मोठा लवाजमा. तर कधी श्रीमंतीचा थाट माट. पण चंद्रपूरमधील आमदाराची आई अजूनही आपला व्यावयसाय धरून आहे. त्यात त्यांना आनंद वाटतो.

चंद्रपूरच्या घनदाट वस्तीत गेली पन्नास वर्षे नेटाने हाच व्यवसाय करणाऱ्या अम्मा जोरगेवार यांनी यंदाही देवी महाकाली यात्रेत थेट फुटपाथवर आपला व्यवसाय थाटलाय. ‘त्यात काय लाजायचं. कष्टाने समाधान मिळत असेल तर आनंदच आहे’, अशी प्रतिक्रिया चंद्रपूरचे आमदार आणि गंगुबाई जोरगेवार यांचे सुपुत्र किशोर जोरगेवार यांनी दिली. बांबू ताटवे, टोपल्या यांचा पिढीजात धंदा करणारे जोरगेवार कुटुंब आजही आपल्या व्यवसायावर ठाम आहेत. तेच श्रम- तोच व्यवसाय- तेच कष्ट आणि तोच आनंद मिळवत आहे. आपल्या आईला व्यवसायाच्या ठिकाणी दमदार गाडीतून सोडणाऱ्या किशोर जोरगेवार यांना या श्रमाचाही प्रचंड अभिमान आहे.
लाल मिरचीने सुखावलं; १० वर्षांतील सर्वाधिक भाव, व्यापाऱ्यांनी थेट गाठली शेतकऱ्यांची घरं
याच मातीतले ज्येष्ठ समाजसेवक कै. बाबा आमटे यांनी ‘श्रम ही है श्रीराम हमारा’ हा नारा दिला होता. हीच उक्ती तंतोतंत लागू होत असलेल्या गंगुबाई जोरगेवार यांच्या या धडपडीचं कौतुक होत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.